What is reason behind Nepal EarthquakeE sakal
ग्लोबल
Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप आणि उत्तर भारतात धक्के असं का?
नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला पण त्याचे धक्के उत्तर भारतातही जाणवले, यामागचं भौगोलिक गणित नेमकं काय? समजून घेऊ, भूगर्भशास्त्रज्ञांकडूनच
शुक्रवारी ३ नोव्हेंबर २०२३च्या रात्री नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला. या भूकंपात सुमारे 130 नागरिकांचा मृत्यू झालाय तर रात्रीतच 70 जणांनी आपले प्राण गमावले होते, एकूण हानी पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
नेपाळमधील या भूकंपाचे धक्के भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात जाणवले. गेल्या महिन्याभरात नेपाळमध्ये तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे.
मात्र नेपाळमध्ये अशाप्रकारे सतत भूकंप का होतात आणि उत्तर भारतावर त्याचा परिणाम का होतो, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल.