Mahesh babu Latest News Mahesh babu Latest News
मनोरंजन

Mahesh Babu : अभिनेता महेश बाबूला मातृशोक; जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

महेश बाबू यांची आई इंदिरा देवी काही महिन्यांपासून आजारी होत्या

सकाळ डिजिटल टीम

Mahesh babu Latest News महेश बाबूची (Mahesh Babu) आई इंदिरा देवी यांचे बुधवारी (ता. २८) पहाटे ४ वाजताच्या सुमारास निधन झाले. सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. महेश बाबू यांची आई इंदिरा देवी काही महिन्यांपासून आजारी होत्या. महेश बाबूचे चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करीत आहेत.

काही महिन्यांपासून आजारी असलेल्या महेश बाबूची (Mahesh Babu) आई इंदिरा देवी यांनी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. या दु:खद घटनेबद्दल चाहते सोशल मीडियावर कठीण काळात महेश बाबूला धीर देण्याचा प्रयत्न करीत आहे. चाहत्यांव्यतिरिक्त साउथचा मेगास्टार चिरंजीवी यांनीही ट्विट करून महेश बाबूच्या आईच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

‘श्रीमती इंदिरा देवी यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. महेश बाबू यांच्या आईच्या आत्म्याला शांती लाभो. मी सुपरस्टार कृष्णा, भाऊ महेश आणि कुटुंबाला माझ्या संवेदना व्यक्त करतो’ असे ट्विट चिरंजीवी यांनी केले आहे.

इंदिरा देवी यांचे पार्थिव श्रद्धांजलीसाठी पद्मालय स्टुडिओमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर महाप्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महेश बाबूच्या चाहत्यांनी अभिनेत्याच्या आईसोबतचे अनेक जुने व्हिडिओही शेअर केले आहेत.

इंदिरा देवी यांचे पार्थिव श्रद्धांजलीसाठी पद्मालय स्टुडिओमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर महाप्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महेश बाबूच्या चाहत्यांनी अभिनेत्याच्या आईसोबतचे अनेक जुने व्हिडिओही शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Cyclonic Winds : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Sugar Stock Limits: साखरेच्या साठवणुकीवर केंद्राचे निर्बंध; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पंधरा दिवसच साठा ठेवता येणार

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

SCROLL FOR NEXT