Malaika Arora Arbaaz Khan son Arhaan Khan Video:  Esakal
मनोरंजन

Arhaan Khan Video: "अरहानवर कारवाई करा.." नेटकरी मलायका-अरबाजच्या लेकावर का भडकले? व्हिडिओ व्हायरल

सोशल मिडियावर अरहानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

Vaishali Patil

Malaika Arora Son Arhaan Khan Trolls: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान गेल्या काही दिवासांपासून त्याच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मात्र त्यानंतर मलायका देखील चर्चेत आली. मलायकाने देखील दुसऱ्या लग्नाला तयार असल्याचे सांगितले. अरबाजच्या लग्नानंतर मलायकानं त्याला इंस्टावरुन अनफॉलो केले आहे.

मात्र आता अरबाज किंवा मलायका नव्हे तर त्याचा लेक अरहान खान चर्चेत आला आहे. सोशल मिडियावर अरहानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

अरहान खानचा एक व्हिडिओ सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आला आहे, या व्हिडिओत तो खुप आनंदी दिसत होता. तो रस्त्याच्या मध्ये पापाराझींसारखी फोटोग्राफी करताना दिसला आहे.

Yamaha RX 100 बाइकवर बसून कॅमेरासोबत फोटोग्राफी करताना दिसला. यात तो मस्तीच्या मूडमध्ये दिसला. पापाराझींचा कॅमेरा घेऊन, तो त्यांच्याप्रमाणे फोटो काढत होता. नंतर, तो कॅमेरा परत करून बाईकच्या मागे जातानाही या व्हिडिओत दिसला.

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मलायकाच्या मुलाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणीही केली. सध्या अरहान खानला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

यावेळी अरहानने डोक्यावर हेल्मेट घातलेले नाही. रहदारीचे नियम न पाळल्यामुळे अरहान खानवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

या व्हिडिओला कमेंट करत एकानं लिहिले की, "हेल्मेट कुठे आहे भावा?" तर दुसऱ्याने लिहिले, "याच्यावर कारवाई करा" तर अनेकांनी अरबाज खानचा मुलगा अरहानला हेल्मेट घालण्याचा आणि रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला.

तर दुसरीकडे अरहान रवीना टंडनची मुलगी राशा थडानीला डेट करत असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. राशा थडानीसोबतचा अरहानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...'

Nashik Dindori accident : नाशिक येथील दिंडोरी अपघातातील एकाच कुटुंबातील ९ मृतांची नावे समोर, क्रेनने काढले मृतदेह बाहेर

Farmer Death News : काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेतात काम करताना अंगावर वीज पडली; 50 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather Alert Today : पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे! महाराष्ट्रातील 'या' 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा Yellow Alert जारी

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातच्या पत्नी कल्पना खरातचा अद्यापही लागला नाही शोध

SCROLL FOR NEXT