Malaika Arora esakal
मनोरंजन

Malaika Arora: 'मलायकाच्या मागे ड्रोन सोडला की काय?'

वयाची चाळीशी पार केल्यानंतर देखील कुणी एवढं सुंदर आणि आकर्षक असू शकतं असा प्रश्न त्यांना मलायकाचा फोटो पाहिल्यानंतर पडतो.

सकाळ डिजिटल टीम

Malaika Arora: बॉलीवूडमध्ये बाकी कुणाची नाही पण मलायकाची नेहमीच चर्चा होत असते. तिचं दिसणं, तिचा फिटनेस, तिची दिलखेचक अदा या साऱ्यांना (Virak Bhayani Photo and video) चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. मलायकाच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते. वयाची चाळीशी पार केल्यानंतर देखील कुणी एवढं सुंदर आणि आकर्षक असू शकतं असा प्रश्न त्यांना मलायकाचा फोटो पाहिल्यानंतर पडतो.

विरल भयानीनं मलायकाचे काही लेटेस्ट व्हिडिओ शेयर केले आहेत. ते पाहून त्याला त्याच्या फॉलोअर्सनं भन्नाट कमेंटस केल्या आहेत. विरलच्या इंस्टावर मलायकाचे रोजचे अपडेटेड फोटो येत असल्यानं नेटकऱ्यांना त्याच्याविषयी भलतेच कुतूहल आहे. तू काय मलायकाच्या मागे ड्रोन सोडला की काय असा प्रश्न त्यांनी त्याला विचारला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या बित्तंबातम्या देण्यात विरल भयानी हा नेहमीच आघाडीवर असतो.

बॉलीवूडची बेबो करिना कपूरच्या बर्थ डे पार्टीमध्ये मलायका दिसून आली. ब्लॅक कलरच्या ड्रेसमधील तिचा घायाळ करणारा लूक व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्या बर्थ पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये बॉलीवूडमधील मोठमोठे कलाकार सहभागी झाले होते. त्यात सोहा अली खान, कुणाल खेमू, आलिया, रणबीर , अनिल कपूर, वरुण धवन यांचा समावेश होता.

विरलनं यापूर्वी मलायकाचा जीमला जात असतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याला देखील नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मलायकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच ते पाहून कमेंट करण्यासाठी नेटकऱ्यांची धांदल उडते. बॉलीवूडमधील प्रसिद्ध फिटनेस फ्रीक पर्सनॅलिटी म्हणून मलायकाकडे पाहिले जाते. सध्या मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाची चर्चा चर्चेत आली आहे. मलायकानं देखील आपण यावर्षी लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी अपडेट! कर्जमाफीची प्रक्रिया सुरू: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अंतर्गत मतभेदांमुळे ‘इंडिया’चे नेते अस्वस्थ

Trinamool Congress: ‘तृणमूल’मधील फुटीचे लोण दिल्लीपर्यंत; वीस खासदारांचा वेगळा गट, ‘एनडीए’ला पाठिंब्यासाठी पत्र

निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती! सोलापूरच्या ‘आयटी पार्क’ची जागा कृष्णा खोरे नियामक मंडळाच्या ३० वर्षांच्या धोरणात अडकली; अभियंत्यांच्या निशिबी प्रतीक्षा

आजचे राशिभविष्य - 09 जून 2026

तिखट-चटपटीत मसाले आणि वितळलेलं चीज; हा 'बेल पेपर टोस्ट' सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठरतो परफेक्ट स्नॅक

SCROLL FOR NEXT