Hrithik Roshan: 'तू कसला गोड आहेस!' सबाची गुलाबी प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan

Hrithik Roshan: 'तू कसला गोड आहेस!' सबाची गुलाबी प्रतिक्रिया

Vikram Vedha Movie: टॉलीवूडच्या विक्रमवेधाचा हिंदी रिमेक पुढील आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आर माधवन आणि विजय सेतूपती यांच्या मुख्य (Hrithik Roshan) भूमिका मुळ चित्रपटांमध्ये होत्या. त्याच हिंदी रिमेकमध्ये ह्रतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या भूमिका आहेत. काही दिवसांपासून या दोन्ही सेलिब्रेटींच्या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर (Saif Ali Khan) ह्रतिकचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्रतिकचा नवा लूक आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर त्याच्या गर्लफ्रेंडनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

ह्रतिक आणि सैफ हे दोघेही सध्या त्यांच्या विक्रमवेधाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यांनी ट्रेलरचे लाँचिंग हे वीसहून अधिक शहरांमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी कोणत्याही चित्रपटाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रमोशन झाले नव्हते. असेही सांगण्यात आले. आता ह्रतिकनं इंस्टावरुन काही खास फोटो व्हायरल केले आहेत. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसत आहे. एकानं तर त्याला ग्रीक गॉड असे म्हटले आहे.

सबानं ह्रतिकला तर तू कसला गोड दिसतो आहे. असे म्हटले आहे. तिच्या त्या प्रतिक्रियेवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. व्हाईट कलरचा शर्ट परिधान करुन ह्रतिकचा वेगळा अंदाज चाहत्यांना घायाळ कऱणारा ठरतो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सबा आणि ह्रतिकच्या नावाची चर्चा होताना दिसतेय. सबा ही बऱ्याचदा ह्रतिकच्या कुटूंबियांशी संवाद साधताना दिसली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांची गुड न्युज चाहत्यांना कळेल. अशी चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा: Raju Srivastava Passed : 'गजोधर भैय्या' गेला! डोळ्यांच्या कडा ओलावल्या...

30 सप्टेंबरला विक्रमवेधा प्रदर्शित होणार आहे. त्यात सैफ अली खान देखील दिसणार आहे. यापूर्वी ह्रतिकचा वॉर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानं तीनशे कोटींची कमाई केली होती. विक्रमवेधा नंतर ह्रतिक हा फायटर नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा: Raju Srivastav: कॉमेडीच्या बादशहाने १२ वर्ष तिच्या होकाराची वाट पाहिली अन्…

Web Title: Hrithik Roshan Saif Ali Khan Vikram Vedha Movie Release Date Saba Azad Reaction New Look

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..