Mumtaz, Manisha Koirala And Sanjay Leela Bansali esakal
मनोरंजन

भन्साळींच्या 'हीरामंडी'त मनीषा कोईराला अन् मुमताज? फोटो झाला व्हायरल

भन्साळींच्या 'हीरामंडी'त मनीषा कोईराला अन् मुमताज?

सकाळ डिजिटल टीम

बाॅलीवूड चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'नंतर (Gangubai Kathiawadi) चित्रपट निर्माता संजयलीला भन्साळी (Sanjay Leela Bansali) आपला आगामी चित्रपट हीरामंडीसाठी सज्ज झाला आहे. त्यांचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या सर्व घाई गडबडीत भन्साळींचा एक फोटो समोर आला आहे. यात ते बाॅलीवूड अभिनेत्री मनीषा कोईराला आणि दिग्गज कलाकार मुमताजबरोबर पोझ देताना दिसत आहेत. हा फोटो स्वतः मनीषा कोईरालाने (Manisha Koirala) आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला.

भन्साळी आणि मुमताजबरोबर फोटो शेअर करताना मनीषा कोईरालाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, लिजेंडच्या कंपनीत.. मला अशा अद्भूत क्रिएटिव्ह लोकांची साथ खूपच आवडते. माझा चेहरा खूप काही सांगून जातो. #धन्य #जीनियस #संजयलीलाभन्साळी #मुमताज. फोटोत दोन्ही अभिनेत्रींच्यामध्ये भन्साळी दिसत आहेत.

हीरामंडीत बरोबर दिसणार

मनीषा कोईरालाने शेअर केलेल्या या फोटोवरुन आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. दोघीही आगामी हीरामंडीत मनीषा आणि मुमताज बरोबरच दिसणार आहेत, असे बोलले जात आहे. दोन्ही अभिनेत्री संजयलीला भन्साळी यांच्याबरोबर काम करण्यास तयार आहेत. जर हे खरे ठरले तर एक सुखद बातमी ठरेल. कारण मनीषा तब्बल चार वर्षानंतर चंदेरी पडद्यावर दिसेल. दुसरीकडे मुमताज जवळपास ४५ वर्षानंतर बाॅलीवूडमध्ये पुनरागमन करेल. एका मुलाखतीत मुमताज यांनी सांगितले होते, की हीरामंडीच्या (Heeramandi) काही डान्स सिक्वेन्ससाठी बोलवले गेले होते. आपल्या बाॅलीवूडमधील वापसीवर त्यांनी शिक्कामोर्तब करत म्हणाल्या ४५ वर्षानंतर पुन्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का द्यायला तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT