Kiran Mane in Politics Esakal
मनोरंजन

Kiran Mane in Politics: अभिनेते किरण मानेंनी शिवबंधन बांधत केला ठाकरे गटात प्रवेश; बोलताना म्हणाले, "राजकारण गढूळ..."

Kiran Mane : आपल्या राजकीय वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे मराठी अभिनेते किरण माने यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात आज प्रवेश केला आहे. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Kiran Mane in Politics: आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. पक्षप्रवेशही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, यामुळे राजकीय पक्षांना बळ मिळताना दिसत आहे. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने आणि बीडमधील काही कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला. उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधून त्यांना ठाकरे गटात प्रवेश दिला.

दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय. पूर्वी शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला पुन्हा शिवसेनेत प्रवेश देणार नसल्याची घोषणा केली.

किरण माने यांनी आजवर मराठी नाटक, सिनेमे, मालिकाविश्वात अभिनय केलाय. ते बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी होते. याशिवाय मुलगी झाली हो, सिंधूताई माझी माई या मालिकांमध्ये त्यांना काम केलंय.

किरण माने यांनी परफेक्ट मिसमॅच, उलट सुलट या नाटकांमध्ये अभिनय केलाय. किरण माने आता अभिनय क्षेत्र गाजवून राजकीय क्षेत्रात कशी वाटचाल करणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

काय म्हणाले किरण माने?

यावेळी बोलताना किरण माने म्हणाले,"शिवसेना सर्वसामान्यांची आहे. राजकारण गढूळ झालेलं असताना एकटा माणूस लढत आहे. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे". "संविधान वाचवण्यासाठी मी पक्षामार्फत काम करेल. मिळेल ती जबाबदारी घेऊन काम करेल".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT