Ajit Pawar: द. मुंबईसह 'या' ९ लोकसभा जागांसाठी अजित पवार गट आग्रही, काँग्रेसचा बडा नेता उमेदवार?

Ajit Pawar: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. तर, महायुतीत लोकसभेच्या नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती आहे.
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. भाजप, काँग्रेस, मनसे या पक्षांसह अजित पवार गटानेही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. महायुतीत लोकसभेच्या नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीकडे आत्ता बारामती, सातारा, रायगड, शिरूर हे मतदारसंघ आहेत. तर या चार मतदारसंघा व्यतिरिक्त धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगरचा जागेसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती आहे.

Ajit Pawar
Abdul Sattar VS Hemant Patil: शिंदे गटाच्या खासदार अन् मंत्र्यांकडून एकमेकांना अश्लिल शिवीगाळ...; ऑडिओ क्लिप व्हायरल

संभाव्य उमेदवारांची नावे

  • १) बारामती - सुनेत्रा पवार

  • २) सातारा - रामराजे नाईक निंबाळकर

  • ३) रायगड - सुनिल तटकरे

  • ४) शिरूर - सध्या शिंदे गटात असणारे या मतदार संघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

  • ५) दक्षिण मुंबई - काँग्रेस मधील बडा चेहरा

  • ६) परभणी- राजेश विटेकर

  • ७) भंडारा गोंदिया - प्रफुल्ल पटेल

  • ८) धाराशिव - राणा जगजितसिंह (सध्याचे भाजप आमदार)

  • ९) छत्रपती संभाजीनगर - सतीश चव्हाण

Ajit Pawar
MNS News: आगामी निवडणुकांची तयारी सुरू असतानाच पुण्यात मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

अजित पवार गटाला हवाय सत्तेत समान वाटा

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार व सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी अनेकदा माध्यमांशी बोलताना यासंदर्भात अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार गटाला सत्तेत समान वाटा मिळायला हवा, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना अनेकदा व्यक्त केली आहे.

“शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात. यावर सविस्तर चर्चा होईल. त्यांचेही ४०च्या आसपास आमदार आहेत. आमचेही ४०च्या आसपास आमदार आहेत. त्यामुळे त्यांना जे काही मिळेल, जेवढी मंत्रीपदं मिळतील तेवढीच आम्हालाही मिळावीत. त्यांना जेवढ्या खासदारकीच्या जागा मिळतील, तेवढ्या आम्हालाही मिळाव्यात. यात काही चूक आहे असं मला वाटत नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Ajit Pawar
Shivsena: खरी शिवसेना कोणाची? हे ठरवणे अध्यक्षांसमोरचे आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत येणार निकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com