marathi actress sukanya mone from baipan bhaari deva want to win oscar award  SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: "मला ऑस्कर मिळावा अशी तिची इच्छा..." सुकन्या मोने कोणाबद्दल म्हणाल्या?

'बाईपण भारी देवा' सिनेमाच्या विशेष स्क्रीनींगला सुकन्या मोनेंनी खास गोष्ट सांगितली

Devendra Jadhav

Sukanya Mone on Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा' सिनेमा २०२३ मध्ये चांगलाच गाजला. मराठी सिनेसृष्टीतील आजवर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून बाईपण भारी देवा ओळखला जातोय.

नुकतंच बाईपण भारी देवा सिनेमाचं विशेष स्क्रीनींग झालं. मुंबईतील प्लाझा सिनेमागृहात हे विशेष स्क्रींनींग झालं. यावेळी सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. त्यावेळी बाईपण भारी देवा मधील लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या मोनेंनी एक खास गोष्ट सांगितली.

मला ऑस्कर मिळावा अशी तिची इच्छा

बाईपण भारी देवा सिनेमात भूमिका साकारणाऱ्या सुकन्या मोनेंनी सिनेमाच्या विशेष स्क्रीनींगला हजेरी लावून सांगितलं की, "आज माझी ९० वर्षांची आई इथे उपस्थित आहे. मला या गोष्टीचा आनंद होतोय. तिची इच्छा आहे की मला ऑस्कर मिळावं. पण आज आई इथे हा सोहळा पाहायला उपस्थित आहे, याचा मला आनंद आहे." असं म्हणत सुकन्या मोनेंनी मनातली इच्छा व्यक्त केली. 'बाईपण भारी देवा' च्या विशेष स्क्रीनींगला सुकन्या मोनेंनी त्यांच्या आईसह उपस्थिती दर्शवली.

विशेष शो सुद्धा हाऊसफुल्ल

'बाईपण भारी देवा' चित्रपटाचे यश साजरं करत निर्माती माधुरी भोसले यांच्यातर्फे १६ डिसेंबर रोजी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि संपूर्ण क्रू यावेळेस उपस्थीत होते. विशेष म्हणजे मुंबईचे डब्बेवाले आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा म्हणून चित्रपट पाहण्यास आवर्जून उपस्थित होते. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हा विशेष शो सुद्धा हाऊसफुल ठरला!

'बाईपण भारी देवा'ची यशस्वी कमाई

'बाईपण भारी देवा' चित्रपटानं पहिल्या आठवड्यातच बाजी मारत १२.५ कोटींचा गल्ला जमवला होता. इतकंच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसातच 'बाईपण भारी देवा'नं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. ७६ व्या स्वातंत्र्यदिनी ७६.५ कोटीचा गल्ला जमवणारा २०२३ चा सुपरहीट चित्रपट ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

Maharashtra Politics : शरद पवारांचं वय झालंय, ते आता थकलेत, 'राष्ट्रवादी'ने कोणत्यातरी पक्षासोबत जावे; मंत्री चंद्रकांतदादांचा थेट सल्ला

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT