Anant Ambani Pre-Wedding Video esakal
मनोरंजन

Anant Ambani Pre-Wedding Video: "प्यार हुआ इकरार हुआ है..." मुलाच्या प्रीवेडिंगमध्ये रंगले मुकेश अन् नीता अंबानी, रोमँटिक Video Viral

Anant Ambani Pre-Wedding Video: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये खूप व्यस्त आहेत.

Sandip Kapde

Anant Ambani Pre-Wedding Video: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये खूप व्यस्त आहेत. या समारंभात जगातील सेलिब्रेटी आले आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्यासह भारत आणि विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. भारतातील सर्व अभिनेते या समारंभात आहेत. सर्व राजकीय नेते देखील उपस्थित आहेत.

दरम्यान मुकेश अंबानी यांनी पत्नी नीतासाठी "प्यार हुआ इकरार हुआ है..." हे गीत गायले आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. प्री-वेडिंग सेरेमनीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. समारंभात दाखवण्यात आलेला एक व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानीसोबत बॉलिवूड गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, मुकेश आणि नीता अंबानी दिग्गज अभिनेते राज कपूर आणि नर्गिस यांच्यावर चित्रित केलेल्या 'प्यार हुआ इकरार हुआ है' गाण्यावर नाचताना दिसत आहेत. जरी हा व्हिडिओ आधीच शूट केला गेला होता, जो प्री-वेडिंगमध्ये दाखवला होता.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या व्हिडिओचे सोशल मीडियावर जोरदाक कौतुक होत आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये शुक्रवारपासून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली. हा विवाहपूर्व कार्यक्रम रिलायन्स ग्रीन्स कॉम्प्लेक्स, जामनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

गायिका रिहाना, अभिनेता शाहरुख खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, राणी मुखर्जी आणि अनेक चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनीही या पार्टीला हजेरी लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT