nagraj manjule kastoori movie teaser  SAKAL
मनोरंजन

Kastoori Teaser: 'कस्तूरी' सुगंध की... कोडं लवकरच उलगडणार! नागराज मंजुळेंच्या नवीन सिनेमाचा टीझर रिलीज

नागराज मंजुळेंचा कस्तुरी सिनेमा बार्शीतील सत्य घटनेवर आधारीत आहे

Devendra Jadhav

नागराज मंजुळे हे भारतीय मनोरंजन लोकप्रिय अभिनेता - दिग्दर्शक - निर्माते. नागराज मंजुळे यांनी सैराट, फॅन्ड्री, झुंड अशा सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.

नागराज मंजुळे यांनी निर्माते म्हणूनही अनेक सिनेमांची जबाबदारी स्वीकारली आणि लोकांपर्यंत हे सिनेमे पोहचवले. अशातच नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आगामी कस्तुरी सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

(nagraj manjule kastoori movie teaser)

काय असणार कस्तुरी सिनेमाची कथा

कस्तुरी हा सिनेमा सनी चव्हाण नावाच्या एका पोस्टमार्टम करणाऱ्या मुलाच्या आयुष्यावर आधारित असून बार्शी मधील कथा आहे. आपल्या अंगाचा वास येऊ नये म्हणून कस्तुरीच्या अत्तराचा शोध घेणाऱ्या दोन मित्रांची धडपड या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

खरं पाहायला गेलं तर समाजातील एक पारंपारिक काम करणाऱ्या मुलाला शिक्षण सोडून द्यावे लागते. कोवळ्या स्वप्नांना नवीन पालवी फुटत असताना ही मुलं आर्थिक व सामाजिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहतात.

नागराज मंजुळे, अनुराग कश्यप करणार सादर

इनसाइट फिल्मची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप हे प्रस्तुत करत आहेत. विनोद कांबळे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

एक उल्लेखनीय बाब अशी की, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, मुख्य कलाकार यांचा हा पहिला चित्रपट असूनही थेट राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत बाजी मारली आहे. तसेच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्येही हा चित्रपट निवडला गेला होता.

तिथंही कस्तुरी हा चित्रपट प्रेक्षकांना भावला असून त्याचं खूप कौतुक करण्यात आलं आहे. कस्तुरी सिनेमा ८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: सत्तारांचे पंख छाटण्यासाठी भाजपचा पहिला वार!;अब्दुल समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद, स्वप्न भंगले; शिवसेनेच्या आमदार जाधव, अण्णासाहेब माने यांनाही धक्का

Latest Marathi News Live Update : अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर

Beed: दलदल, चिखलातून काढावा लागतोय मार्ग ;रस्ते चिखलात; पुरुषोत्तमपुरीत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा भाविकांना फटका

Sangli Satara Election: स्वाभिमान दाखविल्यास निकाल बदलेल: जयंत पाटील, शशिकांत शिंदे; नाराजांची मदत घेणार, दोन्ही राजांनी स्वाभिमान दाखवावा

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचा केंद्र सरकारसह अदाणींना मोठा दणका; २० हजार कोटींच्या स्मार्ट मीटर प्रकल्प केला बंद

SCROLL FOR NEXT