nana patekar new movie ole aale with makrand anaspure sayali sanjeev siddharth chandekar  SAKAL
मनोरंजन

Nana Patekar: नाना पाटेकरांसोबत मकरंद अनासपुरे करणार 'ओले आले'! नव्या मराठी सिनेमाची घोषणा

नाना पाटेकर यांच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय

Devendra Jadhav

Nana Patekar New Movie Ole Ole News: नाना पाटेकर यांची काही वेगळी ओळख सांगायला नको. आजवर अनेक सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. नाना पाटेकर काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रीय झाले आहेत.

अशातच नाना पाटेकर यांच्या नवीन मराठी सिनेमाची घोषणा झालीय. सिनेमाचं नाव आहे ओले आले. विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमात नानांसोबत अभिनेते मकरंद अनासपुरे झळकणार आहेत. जाणुन घ्या सविस्तर.

(nana patekar new movie ole aale with makrand anaspure sayali sanjeev siddharth chandekar)

नाना आणि मकरंद यांचा नवीन सिनेमा ओले ओलेची घोषणा

एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र! 'ओले आले' असं कॅप्शन देत नाना पाटेकरांच्या नवीन मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय.

विशेष गोष्ट म्हणजे हा सिनेमा लोकांना खळखळुन हसवणार यात काही शंका नाही. याशिवाय या सिनेमाच्या माध्यमातुन नाना पाटेकर अनेक वर्षांनी हलक्या फुलक्या विनोदी भुमिकेत दिसणार आहेत.

ओले ओले मध्ये कलाकार आणि सिनेमाची रिलीज डेट

सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे ओले आले मध्ये नाना पाटेकर - मकरंद अनासपुरे यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

याशिवाय या सिनेमात सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव सुद्धा खास भुमिकेत दिसणार आहेत.

ओले आले हा सिनेमा ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईकरांचा घराणेशाहीला दणका! दिग्गज नेत्यांच्या घारातील सदस्य पराभूत

Pune Municipal Election Result: राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये गेलेल्या प्रशांत जगताप यांचा भाजपला धक्का, मित्राचा पराभव करत मारली बाजी

Nashik Municipal Election Results 2026 : नाशिक महानगरपालिका निवडणूक मतमोजणीचे पहिले कल समोर; भाजप अन् शिवसेनेची 'इतक्या' जागांवर आघाडी

PMC Election Results : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग २५ मतमोजणी केंद्रावर प्रचंड गोंधळ; EVM क्रमांक न जुळल्याने रूपाली ठोंबरे आक्रमक

मुंबईत पहिला विजय काँग्रेसचा, भाजपचे नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर विजयी; आतापर्यंत कुणी मारली बाजी?

SCROLL FOR NEXT