Nana Patekar News esakal
मनोरंजन

नाना पाटेकरांच्या मुलाची मल्हारची दणकेबाज इंट्री! नानांच्या नावानचं...

बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा आगळा वेगळा ठसा उमटविणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर.

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा आगळा वेगळा ठसा उमटविणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर, केवळ अभिनय, संवाद फेकीच्या जोरावर या (Nana Patekar) अभिनेत्यानं बॉलीवूडमध्ये स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रस्थापित बॉलीवूड कलाकारांच्या तुलनेत सौंदर्याच्या, देखणेपणाच्या व्याख्येत न बसणारे नाना हे कायमच त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. त्यांच्या (entertainment news) चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्गही तुफान आहे. नानांचा चित्रपट आवर्जुन पाहणारा खास प्रेक्षक आहे. यासगळ्यात नानांच्या मुलानं देखील याच क्षेत्रातून पुढे येण्याचा निर्णय घेतला आहे.

नानांच्या मुलाचा मल्हारचा आणि नानांच्या चाहत्यांचा फारसा परिचय नाही. (Malhar Patekar) त्यानंही नानांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची तयारी केली आहे. खरं तर यापूर्वी नानानं जेव्हा राम गोपाल वर्मा यांचा 26/11 नावाचा चित्रपट केला होता त्यावेळी त्या चित्रपटचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मल्हारनं जबाबदारी पार पाडली होती. आता त्याला प्रसिद्ध दिग्दर्शक(Prakash Jha) प्रकाश झा यांच्या एका चित्रपटातून बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी होती. मात्र नाना आणि प्रकाश झा यांच्यातील वादाचा फटका मल्हारला बसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे एका नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मल्हार प्रेक्षकांसमोर येणार आहे.

मल्हार हा नानांची सेम टू सेम कॉपी आहे असं म्हटलं जातं. नानांनी अभिनेत्री आणि बँक ऑफिसर नीलकांती पाटेकर यांच्याशी विवाह केला. त्यांना मल्हार नावाचा मुलगा आहे. मल्हारबाबत सांगायचे झाल्यास त्यानं मुंबईतील सरस्वती मंदिर येथून शालेय शिक्षण पूर्ण घेतले आहे. त्यानंतर त्यानं कॉमर्सची पदवी घेतली आहे. लहानपणापासून मल्हारला चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड होती. ती त्यानं जपली आहे. मल्हारनं राम गोपाल वर्मा यांच्या 26/11 मध्ये असिस्ट डिरेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. मल्हारनं स्वताचे प्रॉडक्शन हाऊस तयार केले असून त्याला त्यानं नाना पाटेकर यांचे नाव दिले आहे.

Nana Patekar Family

गेल्या काही दिवसांपासून नाना पाटेकर यांच्या मल्हारच्या चित्रपट क्षेत्रातील इंट्रीबाबत अनेकांना उत्सुकता आहे. त्याला दिग्दर्शनामध्ये रस असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT