national cinema day watch any movie with 99 rs jawan gadar 2 subhedar SAKAL
मनोरंजन

National Cinema Day: या तारखेला कोणताही सिनेमा पाहा १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत

या तारखेला कोणताही सिनेमा पहा १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत

Devendra Jadhav

भारतीय मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून अनेक सिनेमांनी धूमाकूळ घातलाय. इतकंच नव्हे सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर छप्परफाड कमाई केलीय.

थिएटरमध्ये प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. तरीही तिकीट जास्त आहे म्हणून काही प्रेक्षक सिनेमा पाहायला जात नाहीत. अशा प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे. भारतात राष्ट्रीय सिनेमा दिवस सेलिब्रेट होत असून प्रेक्षकांना १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत सिनेमा पाहायला मिळणार आहे.

(national cinema day watch any movie)

या तारखेला कोणताही सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयात

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील चित्रपटगृहे 13 ऑक्टोबरला राष्ट्रीय चित्रपट दिन म्हणून साजरा करतील,

या दिवशी ₹99 प्रेक्षकांना सिनेमा पाहता येईल. फक्त ही ऑफर रिक्लिनर्स आणि IMAX किंवा 4DX सारख्या प्रीमियम फॉरमॅटवर लागू होणार नाही.

सर्व सिनेमा कंपन्यांचा पाठिंबा

या वर्षी राष्ट्रीय सिनेमा दिन 4000 हून अधिक स्क्रीनवर साजरा केला जाणार आहे. ज्यामध्ये PVR आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए2, मूव्ही टाइम, WAVE, M2K, Delite आणि इतर अनेक थिएटर कंपन्यांच्या समावेश आहे.

गेल्या वर्षी २०२२ च्या सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या National Cinema Day ला साडेसहा लाख प्रवेश मिळाले होते, जे एका दिवसासाठी आतापर्यंतचे सर्वाधिक होते.

तिकीट कमी केल्याने सिनेमांना फायदा

National Cinema Day निमित्ताने तिकीट कमी केल्याने हिंदी, मराठी आणि इतर सर्व भाषांतील सिनेमांना फायदा झाल्याचा दिसून येतोय.

याआधी ब्रम्हास्त्र, चूप अशा सिनेमांना या दिवसाचा फायदा झाला. काही दिवसांपूर्वी शाहरुखचा जवान, सनी देओलचा गदर 2 बॉक्स ऑफीसवर तुफान यश मिळवत आहेत. याशिवाय अक्षय कुमारचा मिशन राणीगंज सिनेमा सुद्धा रिलीज होतोय.

त्यामुळे National Cinema Day दिवशी म्हणजेच १३ ऑक्टोबरला तिकीटं कमी झाल्याने प्रेक्षक गर्दी करतील. आणि या सिनेमांची आणखी चांगली कमाई होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT