Nawazuddin Siddiqui esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui : 'अहो रोमान्स करायला वयाचं बंधन नसतं, तो कोणत्याही...'

बॉलीवूडचा गणेश गायतोंडे अर्थात नवाझुद्दीन काही ऐकायला तयार नाही. तो सध्या वेगळ्याच मूडमध्ये असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nawazuddin Siddiqui Trolls : बॉलीवूडचा गणेश गायतोंडे अर्थात नवाझुद्दीन काही ऐकायला तयार नाही. तो सध्या वेगळ्याच मूडमध्ये असल्याचे दिसून आले आहे. कंगनाची निर्मिती असलेल्या टीकू वेडस् शेरु नावाच्या चित्रपटामध्ये तो महत्वाच्या भूमिकेत तो दिसणार आहे.

मणिकर्णिका बॅनरच्या अंतर्गत तयार होत असलेल्या या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र यासगळ्यात नवाझुद्दीन हा एका गोष्टीमुळे चर्चेतही आला. त्याचे कारण अवनीत कौर. त्याच्यापेक्षा वयानं वीस वर्षांहून लहान असणाऱ्या या अभिनेत्रीसोबत नवाझुद्दीननं किसिंग सीन दिल्यानं अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

Nawazuddin Siddiqui Trolls

एकीकडे नवाझुद्दीनच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ सुरु असताना त्याच्या आगामी नव्या चित्रपटामध्ये त्याचा गुलाबी अंदाज काही जणांच्या डोळ्यात खुपला आहे. त्यामुळे की काय नवाझुद्दीनवर सगळ्यांनी जोरदार टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वी नवाझुद्दीनच्या संदर्भात एक बातमी व्हायरल होत आहे. ती म्हणजे त्यानं बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि स्वताचे वय याची तुलना केली होती. त्यात नवाझुद्दीननं तुम्हाला शाहरुखचा रोमान्स कसा काय चालतो हा प्रश्न केला होता.

आता नवाझुद्दीननं तरुणाई आणि त्यांची रोमान्सची व्याख्या, त्यांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणतो आजच्या तरुणाईला मोबाईल पासून दूर राहणं जमत नाही. अशावेळी त्यांच्याकडे एकच गोष्ट असते ती म्हणजे मोबाईलची स्क्रीन यातून ते सगळ्यांशी संवाद साधत असतात. आताही त्यांना ब्रेक अप झाल्याच्या बातम्या मोबाईलवरुन समजतात अशावेळी त्यांना रोमान्स काय कळणार.

नवाझुद्दीनच्या प्रतिक्रियांना सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उत्तर दिले होते. आता नवाझुद्दीननं पुन्हा रोमान्ससाठी खास वयाची गरज असते का असेही विचारले आहे. मी माझ्या नव्या चित्रपटामध्ये किसिंग सीन दिला. त्यावरुन मला ट्रोल केले जात आहे. आता त्यात विशेष काय आहे हे मला कळत नाही. त्यामुळे की मला आता असे वाटू लागले आहे की, किसिंगसाठी देखील विशिष्ट वय असावे की काय....नवाझुद्दीनच्या त्या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT