Nawazuddin Siddqui  esakal
मनोरंजन

Nawazuddin Siddqui : ... तर स्वत:वरच गोळी झाडून घेईल! नवाझुद्दीन असं का म्हणाला?

गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन हा वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nawazuddin Siddqui Bollywood Actor now angry : बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी हा त्याच्या वेगळेपणासाठी, हटक्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. आजवर नवाझुद्दीननं जितक्या भूमिका केल्या आहेत त्या प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन हा वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे.

सध्या नवाझुद्दीन हा त्याच्या आगामी जोगीरा सा रा रा चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. हा एक चित्रपट रोमँटिक कॉमेडी आहे. ज्यात नवाझुद्दीन पहिल्यांदाच एका रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. यापूर्वी त्यानं काही चित्रपटातून तशी भूमिका केली आहे. मात्र हा चित्रपट पूर्णपणे रोमँटिक विषयावर आधारित आहे. त्याच्या जोडीला नेहा शर्मा अभिनेत्री दिसणार आहे. या सेलिब्रेटींचे कपल्स व्हायरल होताना दिसत आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

जोगीरा सा रा रा चा ट्रेलर व्हायरल झाला आहे. त्यानंतर चाहत्यांच्या कमेंटस येत आहेत. त्यात नवाझुद्दीनवर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. अभिनेत्यानं माध्यमांशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. नवाजनं यापूर्वी एका सायको किलरची, तृतीयपंथीय व्यक्तीची, कधी कुख्यात गुंडाची, कधी राजकारण्याची, अशा वेगवेगळ्या भूमिकेत तो दिसला आहे. आणि त्याला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. एक कलाकार म्हणून मला नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी मिळाली. आणि मी त्याचा उपयोग करुन घेतला आहे.

एकाच टाईपची भूमिका करणं हे माझ्यासाठी फार कंटाळवाणे काम आहे. आणि मी ते का करायचे हा मोठा प्रश्न आहे. मला जर कुणी एकाच टाईपच्या भूमिका करण्याची अट ठेवली तर ती मी मान्य करणार नाही. तो काही माझ्या स्वभावाचा भाग नाही. मला भलेही कुणी असं म्हणालं की, तुम्ही आम्ही सांगू त्याच भूमिका सातत्यानं करा, तुम्ही सुपरस्टार व्हाल, तर मी ती भूमिका करेल पण स्वताच्या डोक्यात गोळी मारुन घेईल. असं मत नवाझुद्दीननं व्यक्त केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात वाद सुरु झाला आहे.त्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे. मात्र यासगळ्यात त्याचे आगामी काळात विविध विषयांवरील चित्रपट प्रदर्शित होणार असून तो सध्या त्यात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT