मनोरंजन

अभिनेता अरमान कोहलीच्या घरी एनसीबीचा छापा

कलाकारांवर एनसीबीनं ncb वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे.

युगंधर ताजणे

कलाकारांवर एनसीबीनं ncb (narcotic control berau) वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी टीव्ही अभिनेता गौरव दीक्षित gaurav dixit याच्यावर कारवाई करुन त्याला एनसीबीनं अटक केली होती. त्याला 30 ऑगस्टपर्यत एनसीबीच्या ncb (अंमली पदार्थ विरोधी पथक) कोठ़डीत ठेवण्यात येणार आहे. आता त्यानंतर जानी दुश्मन फेम अभिनेता अरमान कोहलीच्या armaan kohli घरावरही छापा टाकण्यात आला आहे. त्या कारवाईतून पोलिसांना काही वस्तु सापडल्या आहेत. ज्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आहे. सध्या अभिनेत्याची चौकशी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात एनसीबीकडून कारवाई होताना दिसत आहे. त्यात आतापर्यत अनेकांना अटकही करण्यात आली आहे. अभिनेता एजाज खानलाही एनसीबीनं अटक केल्याचे दिसुन आले आहे. त्याचीही चौकशी सुरु आहे.

एनीसीबीनं अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला होता. त्यात त्यांना काही नशेचे पदार्थ आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांनी त्या अभिनेत्याची चौकशी सुरु केली आहे. यापूर्वी देखील या प्रकरणांमध्ये अनेकांना अटक झाली आहे. त्यांची चौकशीही झाली आहे. मात्र त्यात पुढे फार काही झालेलं नाही. पोलीस त्याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती आहे. बॉलीवूडच्या ए ग्रेड कलाकारांशिवाय टीव्ही कलाकारांवर देखील पोलिसांनी वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक कलाकारांवर पाळत ठेवली जात असल्याची चर्चा आहे. या अगोदर एजाज खानची देखील चौकशी करण्यात आली होती. त्याला अटकही करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून अनेक नावं समोर आली होती. त्याबाबतही तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. येत्या पुढील दिवसांत पोलीस या दोन्ही अभिनेत्यांवर काय कारवाई करतात हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या निमित्तानं बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण पुढे आलं होतं. त्यावेळी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींची नावं समोर आली होती. आताही सातत्यानं अंमलीपदार्थांच्या बाबत कलाकारांची नावं पुढं येताना दिसत आहे.

आणखी या प्रकरणाबाबत सांगायचं झाल्यास, बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या घडामोडी येण्यास सुरुवात झाली होती. त्यात कित्येक प्रसिद्ध सेलिब्रेटींची नावंही समोर आली होती. आता टीव्ही मनोरंजन tv entertainment क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेता गौरव दीक्षितला gaurav dixit एनसीबीनं ncb अटक केली आहे. गौरवला आता ३० ऑगस्टपर्यत एनसीबीनं आपल्या ताब्यात घेतलं आहे. गौरवकडून एनसीबीनं एमडी आणि चरस जप्त केलं आहे. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT