Dr Amol Kolhe on Nathuran Godase Role Sakal
मनोरंजन

नथुरामच्या भूमिकेबद्दल अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ''व्हाय ऑय किल्ड गांधी'' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) हे नथुराम गोडसेच्या (Nathuram Godase) भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका वादात सापडण्याची शक्यता आहे. काही जणांनी यावर आक्षेप देखील नोंदवला आहे. त्याबाबतच आता खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण -

नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणतात, ''

२०१७ साली या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. त्यावेळी मी कोणत्याही राजकीय पक्षाचं आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत नव्हतो. एखादी भूमिका करताना त्या विचारधारेशी कलाकार १०० टक्के सहमत असेल असं नाही. काही भूमिका आपण विचारधारेसोबत सहमत नसताना करत असतो.''

कलाकार आणि राजकीय आयुष्य वेगळं -

''नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाच्या संदर्भात किंवा गांधी हत्येच्या समर्थनार्थ मी कधीही भूमिका घेतली नाही. एक कलाकार म्हणून करत असलेली भूमिका राजकीय आयुष्याशी जोडणं चुकीचं आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं. कलाकार म्हणून मला ती भूमिका मिळाली. मी कलाकार म्हणून ती भूमिका साकारत आहे. त्याचा राजकीय विचारधारेसोबत संबंध नाही. चित्रपटात नेमकं काय आहे हे प्रदर्शित झाल्यावर समजेल. माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. कलाकार आणि राजकीय भूमिका या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, त्याची गल्लत करू नये'', असं अमोल कोल्हे म्हणाले.

माझ्या पक्षातील लोकांनी विरोध केला तरी मला वाईट वाटणार नाही. कारण त्यांची ती राजकीय भूमिका आहे. प्रत्येकाचा स्वतंत्र्य विषय आहे. पण, मी माझ्या पक्षाला यापूर्वीच माझ्या भूमिकेबद्दल कळवलं आहे. हा चित्रपट कधी चित्रीत झाला हे देखील त्यांना सांगितलं आहे, असंही कोल्हे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT