राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे साकारणार 'नथुराम'; वादाची शक्यता

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे साकारणार 'नथुराम'; वादाची शक्यता

मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आता नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) भुमिकेत दिसणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वत:च आपल्या फेसबुक पोस्ट्सद्वारे दिली आहे. 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात असलेली त्यांची ही भूमिका आता वादात सापडण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 2017 सालचा असून तो सध्या फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 30 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Why I killed Gandhi)

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे साकारणार 'नथुराम'; वादाची शक्यता
Stock Market: सगल तिसऱ्या दिवशी घसरला सेन्सेक्स; गुंतवणुकदारांचं मोठं नुकसान

काय म्हणाले अमोल कोल्हे?

अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टचं शिर्षक 'मी आणि नथुराम गोडसे ही भूमिका' असं आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय की, २०१७ साली केलेला “Why I killed Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डॉक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!” या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.

पुढे त्यांनी म्हटलंय की, कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा! याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा! अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com