Neha Sharma Trolled ESakal
मनोरंजन

Neha Sharma: 'तरुण पिढीपुढे हा असा आदर्श ठेवणार का हे लोक..' ,नेहा शर्माच्या बोल्ड ड्रेसवरनं नेटकऱ्यांचा राग राग..

एका फॅशन शो मध्ये अभिनेत्री नेहा शर्मा सामिल झाली होती,त्यावेळी तिच्या ड्रेसवरनं तिची तुलना उर्फी जावेद आणि पूनम पांड्येसोबत केली गेली.

प्रणाली मोरे

Neha Sharma Trolled: सोशल मीडियावर अभिनेत्री नेहा शर्माचा एका फॅशन इव्हेंट दरम्यानचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरनं अभिनेत्रीला जोरदार ट्रोल केलं जात आहे.

नेहानं रॅम्प वॉक करण्यासाठी घातलेला ड्रेस अनेकांना खटकला आहे. खासकरुन तिनं लेहेंग्यावर जो ब्लाऊज घातला आहे त्यावरनं नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. नेहानं घातलेला हा ब्लाऊज केवळ एका हूकावर बॅलन्स करुन शिवला गेलाय,ज्यामुळे खूपच विचित्र लूक त्याला मिळालेला आहे. (Neha Sharma trolled for wearing bold dress,netizens angry on actress and bollywood video viral)

अभिनेत्री नेहा शर्मा नेहमीच तिच्या लूकवरनं ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. तिचे बोल्ड फोटो अनेकांची प्रशंसा मिळवतात खरे पण अनेकदा तिला त्यावरनं ट्रोलही केलं जातं.

नुकतीच ती एका फॅशन इव्हेंटमध्ये सामिल झाली होती. या इव्हेंटमध्ये नेहानं गोल्डन यलो रंगाच्या लेहेंग्यात रॅम्प वॉक करत सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेतल्या खऱ्या पण सोशल मीडियावर तो व्हिडीओ पोस्ट झाल्यावर लोकांच्या मात्र रागाचा त्याला सामना करावा लागत आहे. नेहाच्या या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत.

हेही वाचा: Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नेहा शर्माच्या या फोटोवर कमेंट करत एकानं लिहिलं आहे,'हा असा ड्रेस घालूनही किती सहज वावरतेय ही..ना लाज..ना शरम..इतका कॉन्फिडन्स येतो कुठून?', आणखी एकानं लिहिलं आहे की,'उर्फी जावेद,पूनम पांडे का बनायला जातेय ही..,' तर एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'हे लोक समाजासाठी आदर्श असतात म्हणे आणि हे असे कपडे घालून आजच्या तरुण पिढीपुढे असा आदर्श ठेवणार का?'

नेहा शर्मानं बॉलीवूड तसंच टॉलीवूडमध्येही काम केलं आहे. 'यमला पगला दिवाना',सोलो','तानाजी 'सारख्या सिनेमांमधून तिला बॉलीवूडमध्ये चांगली ओळख मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT