New Year 2024 Shah Rukh Khan to ranbir kapoor
New Year 2024 Shah Rukh Khan to ranbir kapoor  esakal
मनोरंजन

B-Town 2024 News : नव्या वर्षात कोणते अभिनेते घेणार ब्रेक? 2024 मध्ये 'त्या' सेलिब्रेटींचे चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता कमीच!

युगंधर ताजणे

New Year 2024 Shah Rukh Khan to ranbir kapoor : बॉलीवूड आणि बॉलीवूडमधील सेलिब्रेटी यांची नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसते. त्यात किंग खान शाहरुख पासून विकी कौशल पर्यत अनेक सेलिब्रेटींचे चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींविषयीची चाहत्यांना उत्सुकता असते. यंदाचे वर्ष हे बॉलीवूड सेलिब्रेटींसाठी खूपच लाभदायी होते. पुढील वर्षी मात्र काही महत्वाचे सेलिब्रेटी हे मोठ्या पडद्यापासून ब्रेक घेणार असल्याची चर्चा आहे.

२०२३ मध्ये किंग खानच्या पठाणनं दमदार कमबॅक केले होते. त्या चित्रपटानं तब्बल हजार कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शाहरुखचा जवान आला त्यानंही बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केल्याचे दिसून आले. सध्या त्याचा राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय आहे. या सगळ्यात २०२४ मध्ये शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित होणार किंवा नाही याबद्दल शंका आहे. त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

खरं तर २०२४ मध्ये वेगवेगळ्या सेलिब्रेटींचे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात विजय सेतुपति, कतरिना कैफचा मेरी ख्रिसमस आहे. जॉन अब्राहमचा डिप्लोमॅट आहे. दीपिका अन् ह्रतिकचा फायटरही आहे. अशातच काही अभिनेते आगामी वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे. २०२४ मध्ये शाहरुखचा ऑन द फ्लोअर एकही मुव्ही नसल्याची सांगण्यात येत आहे.

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला सॅम बहादूर प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय होता. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. या वर्षी विकीचे दोनपेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पुढील वर्षी तरी विकीकडे कोणता चित्रपट नसल्याचे सांगण्यात येत आहे.

गदर २ मधून सनी पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आला. त्याच्या या चित्रपटानं तब्बल हजार कोटींची कमाई केली. केवळ भारतच नाही तर जगाच्या पाठीवरील अनेक देशांमध्ये भरपूर कमाई केली होती. येत्या काही वर्षात त्याचा तिसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा होती. अनिल शर्मा त्याचे दिग्दर्शन करणार आहेत. मात्र २०२४ मध्ये सनी बॉक्स ऑफिसपासून लांब राहणार असल्याची चर्चा आहे.

संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं मोठी कमाई केल्याचे दिसून आले. अॅनिमलपासून रणबीरनं आता वेगळ्याच झोन मध्ये प्रवेश केल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. याच वर्षी रणबीरचा तू झुठी मैं मक्कार नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. २०२४ मध्ये रणबीरच्या वाट्याला अद्याप तरी कोणता चित्रपट नसल्याचे वृत्त अमर उजालानं दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT