Kashmir Files Controversy esakal
मनोरंजन

Kashmir Files Controversy: 'मोठं दुर्देव जेव्हा....' पल्लवी जोशी बोलल्या!

गोव्यातील इफ्फी महोत्सवामध्ये जे घडलं त्यावरुन आता देशभरात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.

युगंधर ताजणे

The Kashmir Files Controversy: गोव्यातील इफ्फी महोत्सवामध्ये जे घडलं त्यावरुन आता देशभरात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. तो विषय होता द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा. महोत्सवातील ज्युरी नदाव लॅपिड यांनी हा चित्रपट महोत्सवात आलाच कसा तो तर प्रोपगंडा करणारा चित्रपट आहे. असे विधान केले होते.

लॅपिड यांच्या वक्तव्याचे सोशल मीडियावर मोठे पडसाद उमटले होते. त्यामध्ये चित्रपटामध्ये मुख्य भूमिका केलेले अनुपम खेर, निर्माते अशोक पंडित आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या नावाचा समावेश होता. त्यात अभिनेत्री आणि काश्मीर फाईल्सच्या निर्मात्या पल्लवी जोशी यांच्या प्रतिक्रियेची भर पडली आहे. त्यांनी लॅपिड यांच्यावर टीका करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

इफ्फी चर्चेत आला तो काश्मीर फाईल्समुळे. त्याच्यावर महोत्सवातील ज्युरींनीच नाराजी व्यक्त केल्यानंतर त्या वक्तव्याचे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावरही तीव्र पडसाद उमटले आहेत. राजकीय नेत्यांनी देखील त्यात आपल्या प्रतिक्रिया देत लॅपिड यांचे समर्थन केले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर काश्मीर फाईल्स हा भाजपचाच चित्रपट असल्याचे वक्तव्य केले होते. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील लॅपिड यांचे समर्थन केले होते.

पल्लवी जोशी यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांनी लॅपिड यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, गेल्या कित्येक दशकांपासून आंतरराष्ट्रीय समुदाय हा काश्मीर प्रश्नांवर शांत राहिला. त्यांनी काश्मीरमध्ये जे काही होते आहे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि आता गोव्यातील इफ्फीमध्ये यावर प्रतिक्रिया दिली होती. चित्रपटाला नावं ठेवली जातात. हे मोठं दुर्देव म्हणावे लागेल. तीन दशकांनंतर का होईना भारतातील चित्रपट विश्वाला त्या गोष्टीची गांभीर्यानं दखल घ्यावीशी वाटली या गोष्टीचाच गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. असे जोशी म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip BJP Leader Statement : कथित ऑडिओ क्लिपवर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल ०, यशस्वी जैस्वाल १७; भारताचा डाव ११३ धावांवर गडगडला, नागपूरचा यश राठोड एकटा भिडला

Drought Crisis: सरकारी विभागांच्या निधीला कात्री ; दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या २० टक्के निधी कपातीच्या सूचना

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Belgaum-Kolhapur Direct Railway : सर्वेक्षण झाले, पण प्रत्यक्ष काम कधी? बेळगाव-कोल्हापूर रेल्वेच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, जनआंदोलनाचा निर्धार

SCROLL FOR NEXT