Pathaan Trailer launch  sakal
मनोरंजन

Pathaan Trailer: राडा केला पण दणकाचं दिला! काही मिनिटातचं मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार.. ट्विटरवर नेटकरी सुसाट

Vaishali Patil

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने पुन्हा त्यांची जादू दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. होय, 'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो आता व्हायरल झाला आहे. याच्या टीझरमध्ये शाहरुख खानने हवामान बदलत असल्याचे म्हटलं आणि ट्रेलरने तर खरचं सगळं वातावरणचं बदललं आहे.

'पठाण' चा ट्रेलर रिलिज होताच अवघ्या काही मिनिटातच या चित्रपटानं तुफान राडा करायला सुरुवात केली. अवघ्या १९ मिनिटातचं पठाण च्या ट्रेलरने १ मिलिअन व्हयूजचा टप्पा पार केला. शाहरुखचे चाहते त्यांच कौतुक करतांना थकत नाही आहे. त्याच बरोबर दिपिका आणि जॉननेही चित्रपटात जीव ओतला आहे. धमाकेदार ॲक्शन आणि तुफान स्टंट करत पठाणने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी आता ट्विटरवर राडा केला आहे.

अनेक कलाकारांनी शाहरुखच्या पठाण चा ट्रेलर त्याच्या ट्विटरवरुन शेअर करत पठाण च्या टिमला शूभेच्छा दिल्या आहेत. त्यात साउथ स्टार राम चरण आणि थलपती विजयनेही या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

अँक्शन आणि रोमान्सने पठाण चा ट्रेलर व्यापून टाकला आहे. शाहरुख आणि दीपिका दोघेही ट्रेलर मध्ये भरपूर ॲक्शन करताना दिसत आहेत. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री सुद्धा पाहायला मिळतेय. या दोघांशिवाय जॉन अब्राहमचा रॉकिंग रावडी अंदाज ट्रेलर मध्ये दिसून येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

दीप-ज्योतीची वाढती जवळीक तर तारिणीच्या जीवाला धोका; ‘झी मराठी’वरील मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT