
Pathaan: ठरलं तर मग!, भारतात 'या' दिवशी सुरू होणार 'पठाण' चे Advance Booking
Pathaan: शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण अभिनित पठाण सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग लवकरच सुरु होणार आहे. यासाठी तारीखही ठरली आहे. आणि यामुळे आता लवकरच कळेल की शाहरुख खानच्या कमबॅकचं स्वागत लोक कसं करतायत ते.
बर्लिन, डॅमटोर आणि म्यूनिक सारख्या ठिकाणी सिनेमाचं अॅडव्हान्स बूकिंग याआधीच सुरु केलं गेलं आहे. आणि फक्त एका दिवसात तिथले थिएटर्स हाऊसफूल्ल झाल्याची बातमी आहे.(Pathaan Advance Booking in india Date reveal)
हेही वाचा: Neena Gupta यांचा 'तो' व्हिडीओ पाहून शिट्टया अन् टाळ्या.. लोक म्हणू लागले,'यांच्यासमोर मलायका म्हणजे..'
'पठाण' भारत आणि अन्य देशात मिळून २५ जानेवारी रोजी रिलीज केला जाणार आहे. आणि याच्या अॅडव्हान्स बूकिंग विषयीचं बोलायचं झालं तर १४ जानेवारी रोजी हे भारतात सुरू केलं जाणार आहे. म्हणजे सिनेमाच्या रिलीज डेट आधी चाहत्यांकडे पूर्ण दहा दिवसांचा वेळ असेल शाहरुखचा सिनेमा आपल्या फेव्हरेट थिएटरमध्ये बसून पाहण्यासाठी तिकीट बूक करण्यास.
हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: निकाला आधीच समोर आलं विनरचं नाव? स्मिता गोंदकरचा गौप्यस्फोट..
अर्थात यशराज फिल्म्स कडून अद्याप यासंदर्भात अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही. पब्लिकच्या प्रतिसादाविषयी बोलायचं झालं तर सिनेमाची घोषणा झाल्यापासून तो चर्चेतच होता आणि टीझर रिलीज झाल्यानंतर काय सुरु झालं हे वेगळं सांगायला नकोच.
संपूर्ण भारतभर सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यावरनं आणि त्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरनं वाद सुरु आहे. पण असं असलं तरी शाहरुख,दीपिका आणि जॉन अब्राहम यांचे चाहते सिनेमाची वेड्यासारखी वाट पाहत आहेत.
हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर
हेही वाचा: Manoj Bajpayee ची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला,'माझ्यासोबत संवाद थांबवा..', काय घडलं नेमकं?
भारतात IES तंत्रज्ञाना अंतर्गत रिलीज होणारा हा पहिला सिनेमा असणार आहे. शाहरुख खानने PVR सोबत हातमिळवणी करत या तंत्रज्ञानाच्या आधारे सिनेमा लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या काही सिनेमागृहात या तंत्रज्ञानाच्या आधारे सिनेमा रिलीज केला जाईल. ज्या माध्यमातून मुख्य स्क्रीन व्यतिरिक्त थिएटरमध्ये साइडला देखील स्क्रीन असतील. ज्यामुळे व्हिज्युअल एक्स्पीरियन्सची मजा दुप्पट अनुभवता येणार आहे.