Police team reached Salman Khan’s Galaxy apartment after receiving threats, increased security of the actor Google
मनोरंजन

सलमानच्या 'गॅलेक्सी' अपार्टमेंटमध्ये पोहोचले पोलिस,सुरक्षेत अचानक वाढ...

सलमान खान आणि सलीम खान यांना एका अज्ञात इसमानं पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी काही दिवसांपू्र्वी दिली होती.

प्रणाली मोरे

सलमान खान(Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांना एका अज्ञात इसमानं पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी(Receiving threats) दिली अन् अचानक त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ (increased security) केली गेली. मुंबई पोलिसांनी यावर अॅक्शन घेतल्याचं दिसून आलं आहे. बांद्रे पोलिस ठाण्यात या संदर्भात केस नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याच दरम्यान मुंबई पोलिसांची एक टीम सलमानच्या घरी पोहोचलीय अन् चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

सलमान खानला काही दिवसांपूर्वीच गॅंगस्टार लॉरेन्स बिश्नोईनं जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स बिश्नोई तोच ज्याच्यावर पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला याची हत्या केल्याचा आरोप आहे. सध्या तो तिहार जेलमध्ये कैदेत आहे. बिश्नोई म्हणाला होता की सलमानसोबत देखील तेच होणार,जे सिद्धू मुसेवालासोबत झालं. धमकी देणारं ते पत्र सलमानला कोणी आणि कुठून पाठवलं याबाबत अद्याप काही माहिती पडलेलं नाही. पण या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाची चर्चा सुरू झालीय.

धमकी देणारं ते पत्र मिळाल्यानंतर सलमानचे वडील सलीम खान मुंबई बान्द्रे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. पोलिसांनी आयपीएस सेक्शन ५०६ अंतर्गत तक्रार नोंदवली आहे. आणि या प्रकणात कारवाई देखील सुरु केली आहे. पण अद्याप हे कळू शकलं नाही की त्या पत्रात काय लिहिलं होतं आणि ते कुणी पाठवलं होतं. बोललं जात आहे की ते पत्र सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला अशा ठिकाणी मिळालं ज्या ठिकाणी ते मॉर्निंग वॉकसाठी जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT