Poonam Pandey viral Post esakal
मनोरंजन

Poonam Pandey New Post : 'माझी भूमिका योग्यच पण बाजारीकरण करणाऱ्या...' पूनम पांडेंच्या नव्या पोस्टमधून वेगळाच खुलासा

अखेर पूनम पांडेनं (Poonam Pandey New Post ) तिच्या नव्या पोस्टमधून तिच्यावर जे आरोप केले जात होते त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Poonam Pandey Post : सेलिब्रेटी पूनम पांडेच्या नव्या पोस्टनं पुन्हा एका वेगळ्याच गोष्टीला सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी तिनं आपण एक नवीन सत्य समोर (Poonam Pandey Latest Post) आणणार असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर आताच्या पोस्टमधून वेगळीच माहिती समोर आली आहे.

मी जे काही केलं ते मला माहिती आहे, माझा हेतू काय होता हेही मला ठाऊक आहे. त्याबाबत (Poonam Pandey Latest News) ज्यांनी कुणी बाजारीकरण केले त्यांच्याविषयी मात्र मला कमालीचा राग आहे. मी ज्या भूमिकेतून सर्व्हिकल कॅन्सरच्या बाबत प्रबोधन केले त्यात माझी भूमिका स्वच्छ होती. त्यातून मला अनेकांचा आधार मिळाला होता.

सध्या मी पाहते ज्या भूमिकेनं त्या आजारासाठी काम केलं त्या माझ्या पोस्टचा फायदा दुसऱ्यांनाच झाला आहे. त्यामुळे मला ज्यांनी कुणी माझ्या पोस्टचे बाजारीकरण केले आहे त्यांचा (Poonam Viral News) शोध घ्यायचा आहे. असं पूनमनं त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पूनमची काही दिवसांपूर्वी निधन झाल्याची बातमी समोर आली होती. खरं तर तिच्या पीआर (Poonam Death News Viral) टीमकडूनची त्याबाबत एक पोस्ट शेयर करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर पूनमनं एक व्हिडिओ व्हायरल करुन आपण कुठेही गेलो नसून जिवंत असल्याचे सांगून चाहत्यांना, नेटकऱ्यांना धक्का दिला होता. त्यावरुन तिला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. पूनमनं आपण सर्व्हिकल कॅन्सर या आजाराबाबत जनजागृती करत असल्याचे म्हटले होते.

पूनमनं तिच्या पूर्वीच्या एका पोस्टमध्ये म्हटले होते की, तुम्ही पाहिलतं मी अजून कोणतंही सत्य समोर आणलंही नाही तोच मला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. स्टेकहोल्डर्सच्या मनात भीती दिसून येत आहे. त्या सगळ्याच परिणाम म्हणून आता माझ्याविरोधात कायदेशीर करायची असं सगळं सुरु झाले आहे. असे पूनमनं त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा व्हायरल झालेल्या नव्या पोस्टनं पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT