The Indrani Mukerjea Story news
The Indrani Mukerjea Story newsesakal

Indrani Mukherjee Story : शीना बोरा हत्याकांडावरील माहितीपट प्रकरणी कोर्टात गेलेल्या 'CBI'ला कोर्टाचा दणका, याचिका फेटाळली!

सीबीआयकडून जी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती ती (Sheena Bora Murder) स्पेशल कोर्टानं फेटाळली आहे.
Published on

Buried Truth – The Indrani Mukerjea Story : नेटफ्लिक्सवर येत्या २३ फेब्रुवारी रोजी जी डॉक्युसीरिज प्रदर्शित होणार आहे त्या शीना बोरा मर्डर (Buried Truth – The Indrani Mukerjea Story news) केस माहितीपटावरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. सीबीआयनं काही केल्या हा माहितीपट दाखवण्यात येऊ नये म्हणून स्पेशल कोर्टात धाव घेतली होती. त्यावर कोर्टानं महत्वाचा निर्णय दिला आहे.

सीबीआयकडून जी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती ती (Sheena Bora Murder) स्पेशल कोर्टानं फेटाळली आहे. नेटफ्लिक्सवर बुरीड ट्रुथ - द इंद्राणी मुखर्जी स्टोरी( Buried Truth – The Indrani Mukerjea Story) नावाची माहितीपट मालिका येत्या दिवसांत प्रदर्शित होणार असून त्याविरोधात सीबीआयनं कोर्टात धाव घेतली होती.

शीना बोरा केसशी संबंधित अनेक व्यक्तींचा त्या मालिकेमध्ये उल्लेख आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एस पी नाईक-निंबाळकर यांनी म्हटले आहे की, सीबीआयला त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर योग्य ते कारण देता आलेले नाही, ती मालिका ओटीटीवरुन का दाखविण्यात येऊ नये याविषयीची ठोस कारणं समोर आलेली नाहीत.

तसेच कोणत्या कायदेशीर तरतूदीनुसार त्या मालिकेचे प्रक्षेपण थांबविण्यात यावे हे देखील सीबीआयला सांगता किंवा मांडता आलेलं नाही. असे निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. आयएमडीबीच्या माहितीनुसार, या मालिकेतून २५ वर्षीय शीना बोरा तिची झालेली हत्या आणि त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे. या घटनेतील प्रमुख आरोपी शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जी या सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे.

सीबीआयनं या मालिकेतून शीना बोरांनी जे काही आरोप केले आहे त्यावर बोट ठेवल्याचे म्हटले आहे. रायगड जिल्ह्यातील त्या जंगलामध्ये काय झाले होते हे त्यांनी या मालिकेतून सांगतिले आहे. २०१५ मध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्या ड्रायव्हरला दुसऱ्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. असे सीबीआयच्या याचिकेत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com