Prasad Oak Instagram
मनोरंजन

Prasad Oak Video: 'सगळ्या डिग्र्या...सगळं शिक्षण पाण्यात...', कोणावर वैतागला प्रसाद ओक?

प्रसाद ओकनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यावर सध्या चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पहायला मिळत आहे.

प्रणाली मोरे

Prasad oak: प्रसाद ओक सोशल मीडियावर भलताच सक्रिय पहायला मिळतो. तो नेहमीच वेगवेगळे रील्स,व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो आणि धमालही आणतो. अर्थात यामध्ये त्याची पत्नी देखील अनेकदा त्याला साथ देताना दिसते.

सध्या सोशल मीडियावर त्यानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 'तर सगळ्या डिग्र्या...सगळं शिक्षण पाण्यात....' असं नेमकं का म्हणाला प्रसाद ओक..चला जाणून घेऊया.(Prasad Oak marathi actor video post funny netizens reaction)

प्रसाद ओकनं सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो म्हणताना दिसत आहे,''तुम्ही किती डिग्र्या घ्या,शिक्षण घ्या, स्कॉलरशीप मिळवा, दहावी-बारावी बोर्डात या ..पण ते एक वाक्य जेव्हा कानावर पडतं तेव्हा सगळं शिक्षण पाण्यात...आता ते एक वाक्य म्हणजे जेव्हा तुमची बायको तुम्हाला म्हणते,तुला ना यातलं काही कळत नाही...''

आता हा व्हिडीओ पोस्ट करत प्रसादनं एकप्रकारे बायका आपल्या नवऱ्यांना कसं कमी लेखतात,नवरे किती बिचारे हे दाखवण्याचा प्रय़त्न केला आहे. पण खरी मजा तर पुढेच आली आहे. जेव्हा प्रसादच्या या व्हिडीओ पोस्टवर त्याच्या नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. काहींनी प्रसादने व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या भावानांचे समर्थन केले आहे तर काहींनी त्यालाच उलट सुनावले आहे. प्रसादची ती व्हिडीओ पोस्ट बातमीत जोडलेली आहे.

प्रसाद ओक काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चेत आला होता ते 'धर्मवीर' या गाजेलल्या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यामुळे. आता चाहत्यांना दुसऱ्या भागात काय पहायला मिळतंय याची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT