'काही चुकलं का माझं?', व्हिडीओ पोस्ट करत प्रसाद ओकचा चाहत्यांना सवाल Prasad Oak | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Actor Prasad Oak Video ..ask question to fans, funny video

Prasad Oak: 'काही चुकलं का माझं?', व्हिडीओ पोस्ट करत प्रसाद ओकचा चाहत्यांना सवाल

Prasad Oak: प्रसाद ओक एक उत्तम अभिनेता आहे,तसा तो उत्तम दिग्दर्शकही आहे. पण सध्या तो सोशल मीडियावर देखील आपल्यातील नटखट रुपाचं प्रदर्शन करत लोकांचे निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. तो सोशल मीडियावर नेहमीच आपल्या वैयक्तिक तसंच व्यावसायिक आयुष्याविषयी अपडेट देताना दिसतो. सिनेइंडस्ट्रीत सुरु असलेल्या अनेक उपक्रमांविषयी देखील तो आपल्याला माहिती शेअर करताना दिसतो. प्रसाद आपल्या पत्नीसोबतचे देखील अनेक व्हिडीओ शेअर करत धम्माल आणत असतो. आणि त्या दोघांचे व्हिडीओ निखळ मनोरंजन करताना दिसतात. (Marathi Actor Prasad Oak Video ..ask question to fans, funny video)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: घराबाहेर पडल्यावर रोहित शिंदेची पोस्ट चर्चेत,गर्लफ्रेंड रुचिराला केलं टोटल इग्नोर..

प्रसादनं नुकताच एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला आहे. तो व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शन दिले आहे की,'काही चुकलं का माझं?'...आता हे वाचून त्याचा चाहता वर्ग प्रथमदर्शनी थोडा हैराण झाला असणार हे नक्की. पण पुढे प्रसादचा तो व्हिडीओ ज्यानं कुणी पाहिला असेल त्याची मात्र हसून हसून पुरती वाट लागली असणार हे नक्की. प्रसादचा त्या व्हिडीओतील मुकाभियनही एकदम झकास...

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

त्या व्हिडीओत डोळे बंद करुन झोपलेला प्रसाद ओक...तेवढ्यात त्याच्या कानावर पडणारा आवाज...'बेबी खुशनसीब को इंग्लीश में क्या कहते है?' तेव्हा त्यावर प्रसादचं उत्तर...'अनमॅऱिड..',आणि त्यानंतर त्याच्या कानशीलात पडणारा खळळळ...खट्याळ... आवाज....प्रसादचा त्यावरील अभिनय कडक...आता त्यापुढे खरी गम्मत ते म्हणजे हा व्हिडीओ पोस्ट करत प्रसादनं चाहत्यांना 'काही चुकलं का माझं?' जो प्रश्न विचारला आहे त्यावर त्यांनी केलेला उत्तरांचा वर्षाव. सगळी उत्तरं वाचनीयच म्हणावीत...कुणी लिहिलंय,'खूपच चुकलं सर..' तर कुणी एकानं लिहिलंय,'खरं बोललं की असंच होतं सर...' तर प्रसादचा हा धम्माल व्हिडीओ बातमीत जोडला आहे...चेहऱ्यावर हसू नक्कीच येईल...एकदा पहा तरी...