Priyadarshini Indalkar got bad experience from instagram users maharashtrachi hasyajatra actress  SAKAL
मनोरंजन

Priyadarshini Indalkar: अनेक पुरुष माझ्या फोटोवर.. प्रियदर्शनीला युजर्सकडून आला वाईट अनुभव, वाचा संपूर्ण प्रकरण

प्रियदर्शनीने सोशल मीडियावर तिला आलेला वाईट अनुभव सांगितला आहे

Devendra Jadhav

Priyadarshini Indalkar News: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर ही सोशल मीडियावरील चर्चेत अभिनेत्री. महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या माध्यमातून प्रियदर्शनी घराघरात पोहोचली आणि लोकप्रिय झाली.

प्रियदर्शनीचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फोलॉइंग आहे. प्रियदर्शनीला मात्र नुकतंच तिच्या सोशल मीडियावर युजर्सचा वाईट अनुभव आला. तो तिने सर्वांसोबत शेयर केलाय.

झालं असं की, प्रियदर्शनी काही फोटोंवर एका युजरने अत्यंत विचित्र आणि अश्लील कमेंट केल्या आहेत. या युजरने केलेला मेसेजचा स्क्रीनशॉट प्रियदर्शनीने सोशल मीडियावर शेयर केलाय.

हा स्क्रीनशॉट शेयर करून प्रियदर्शनी लिहिते, “अर्थात अशा comments, messages येणार!” “फोटो टाकतानाच कळायला पाहिजे”

अनेक पुरुष अशा फ़ोटोज़ वर खूप gracefully comment करतात. एखादा फ़ोटो hot वाटणं आणि ते व्यक्त करणं ही गोष्ट offensive नाही."

प्रियदर्शनी पुढे सांगते, "पण अशा पद्धतीचे मेसेज नक्कीच offensive आहेत. आणि ते ignore करत राहिलो तर हे normalise होईल. म्हणुन हे सगळं लिहीणं.आणि या उपर, फ़ोटो चा काही reference नसतानाही असे अनेक मेसेज, अनेक मुलींना येत असतात, काही प्रमाणात मुलांनाही येत असतात.

तर या सोशल मीडिया च्या निनावी जनतेला तसं तर आपण काही करु शकत नाही, फक्त आपल्या बाबतीत ‘रिपोर्ट’ करु शकतो.

आणि I've been really lucky about this, I've had

(relatively) much much positive love on Instagram !"

अशा शब्दात प्रियदर्शनीने तिच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियदर्शनीच्या व्यक्त केलेल्या मताच अनेकांनी समर्थन केलंय.

सोशल मीडियावर युजर्स करत असलेल्या मेसेजचा खरपूस समाचार याआधी अनेक अभिनेत्रींनी घेतलाय. मिताली मयेकर, ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवी अशा अनेक अभिनेत्रींनी अशा युजर्सची चांगलीच शाळा घेतलीय. आता प्रियदर्शनीला आलेला हा अनुभव बघून तिनेही या अन्यायाला वाचा फोडली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT