Priyanka Chopra dresses up daughter Malti in a lehenga for on her father death anniversary SAKAL
मनोरंजन

Priyanka Chopra: प्रियंकाने मालतीला सजवलं भारतीय पोशाखात, आजोबांसमोर छोटी झाली नतमस्तक

प्रियंकाने तिच्या लहानग्या मालतीला भारतीय पोशाखात सजवलं आणि तिला आजोबांच्या पुण्यतिथीला घेऊन गेली.

Devendra Jadhav

Priyanka Chopra Daughter Malti News: प्रियंका चोप्रा ही भारत नव्हे तर जगभरातील लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका. प्रियंकाने स्वतःच्या कर्तृत्वाने फार कमी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध केलंय.

प्रियंकाने निक जोनास सोबत लग्न केलं आणि या दोघांना मालती ही मुलगी आहे. प्रियंका छोट्या मालतीवर पारंपरिक संस्कार करताना दिसते. असाच एक अनुभव नुकताच दिसला.

प्रियंकाने तिच्या लहानग्या मालतीला भारतीय पोशाखात सजवलं आणि तिला आजोबांच्या पुण्यतिथीला घेऊन गेली.

(Priyanka Chopra dresses up daughter Malti in a lehenga for on her father death anniversary)

प्रियंका लहानग्या मालतीला संस्कार शिकवताना दिसते. व्हायरल झालेल्या पहिल्या फोटोत मालती चोप्रा लेहेंगा परिधान करून अतिशय गोंडस दिसत आहे. कोणीतरी तिचा एक हात धरला आहे, तर मालती दुसऱ्या हाताने तिच्या पोटाच्या बटणाला स्पर्श करत आहे.

हा फोटो शेअर करत प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'कोणीतरी तिच्या लेहेंग्यात बेली बटण पाहिले आहे.' दुसऱ्या छायाचित्रात मालती जमिनीवर पडलेली फुले उचलताना दिसत आहे. यावर प्रियांकाने लिहिले आहे की, 'मिस यू डॅड.'

प्रियंकाचे बाबा अशोक चोप्रा यांची पुण्यतिथी स्मरण होतं. त्यानिमित्ताने प्रियंका लहानग्या मालतीला घेऊन आजोबांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रार्थना करायला गेली होती.

छोटी मालती लेहेंगा आणि ओढणी सावरत होती. याशिवाय तिने आजोबांच्या प्रतिमेवर फुलं वाहिली. प्रियंकाचे आई म्हणून मालतीवर असलेले संस्कार यानिमित्ताने दिसून येतात.

प्रियांका आणि निक यांची लेक मालतीचा जन्म जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे झाला होता. प्रियंका आणि निक यांनी सोशल मीडियावर मुलीचे स्वागत करताना ही पोस्ट लिहिली होती.

"आम्ही सरोगेटद्वारे बाळाचे स्वागत केले आहे याची पुष्टी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे." दरम्यान प्रियंकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झालं तर ती अलीकडेच सिटाडेल या वेबसिरीजमध्ये दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT