Priyanka Chopra & Nick Jonas Move Out Of Their ₹166 Crore LA esakal
मनोरंजन

Priyanka Chopra News: राहत्या घरावर प्रियांकाला सोडावं लागलं पाणी! १६६ कोटींचं घर सोडण्यामागे काय होतं कारण?

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही आता ग्लोबल स्टार झाली आहे.

युगंधर ताजणे

Priyanka Chopra & Nick Jonas Move Out Of Their ₹166 Crore LA : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही आता ग्लोबल स्टार झाली आहे. तिनं केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमध्ये देखील स्वताच्या नावाची वेगळी ओळख तिनं निर्माण केली आहे. प्रियंकानं हॉलीवूडचा प्रसिद्ध गायक निक जोनाससोबत लग्न केलं आणि ती अमेरिकेत स्थायिक झाली.

आता प्रियंकाच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रियंकानं तिनं ज्या एजंटकडून घर घेतले होते त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्याची बातमी समोर आली आहे. प्रियंकानं तब्बल १६६ कोटी रुपये मोजून नवीन घर खरेदी केले होते. मात्र त्या घराला काय ग्रहण लागले हे माहिती नाही. त्या घरात पाण्याची गळती सुरु झाल्याचे प्रियंकाचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे प्रियंका आणि निकला त्यांचे राहते घर सोडावे लागले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंकाच्या दुसऱ्या नव्या घराचे काम सुरु असताना तिथे तिला मुलगी मालतीसह राहायला जावं लागलं आहे. फ्री प्रेसनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. प्रियंकानं देखील जो प्रकार झाला तो खूपच भयानक असल्याचे म्हटले आहे. खरं तर गेल्या वर्षीच्या मे मध्ये संबंधित एजंटच्या विरोधात कोर्टात केसही दाखल करण्यात आली आहे. प्रियंकाच्या घरातील जो स्विमिंग पूल आणि स्पा एरिया आहे त्यामध्ये गळती सुरु असल्याचे समोर आले आहे.

त्या गळतीमुळे प्रियंकाच्या घरातील इंटेरियरचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. अशा घरामध्ये राहणे हे आरोग्याच्या दृष्टीनं देखील धोकादायक असल्याचे प्रियंकानं म्हटले आहे. कोर्टानं देखील या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रथमदर्शनी तरी घराची दुरावस्था झाल्याचे दिसत आहे आणि हे प्रकरण गंभीर आहे. संबंधित एजंटनं तक्रारदारांना भरपाई आणि डागडुजी करुन देणे गरजेचे आहे.

सप्टेंबर २०१९ मध्ये प्रियंकानं २० मिलियन डॉलर अर्थात १६६ कोटी रुपयांचे अलिशान घर खरेदी केले. त्यात सात बेडरुम्स, नऊ बाथरुम्स, किचन, टेम्परेचर कंट्रोल वाईन रुम आणि इनडोअर बास्केटबॉल कोर्ट, होम थिएटर, स्पा, स्टीम शॉवर आणि जीम यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT