Ranbir Kapoor : 'कामाचे तास फिक्स पाहिजे, सेटवर शिस्त हवी अन्...' भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' साठी रणबीरच्या काय आहेत अटी?

सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेतील अभिनेता म्हणून रणबीर कपूरचे नाव घ्यावे लागेल.
Ranbir Kapoor Love And War Movie Sanjay Leela Bhansali
Ranbir Kapoor Love And War Movie Sanjay Leela Bhansali esakal

Ranbir Kapoor Love And War Movie Sanjay Leela Bhansali : सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेतील अभिनेता म्हणून रणबीर कपूरचे नाव घ्यावे लागेल. त्याच्या अॅनिमल नावाच्या चित्रपटाला चाहत्यांचा, प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या सगळ्यात अभिनेता विकी कौशलनं शेयर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटानं आठशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०२५ पासून रणबीर अन् बॉबी देओलच्या अॅनिमलच्या सिक्वेलला अॅनिमल पार्क चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी लव अँड वॉरमध्ये रणबीर कपूर दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. भन्साळी यांच्या सावरिया नावाच्या चित्रपटातून रणबीर आणि सोनम कपूर यांनी बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं होतं. या चित्रपटामध्ये रणबीरसह आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. विकी कौशलनं त्याच्या इंस्टावरुन या संदर्भात एक खास पोस्टही केली आहे.

या सगळ्यात रणबीर कपूरनं वेगवेगळ्या अटी ठेवल्याची बातमी समोर येत आहे. फ्री प्रेस जर्नलन याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. खरं तर विकीच्या पोस्टशिवाय बाकी या चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रणबीरनं अखेर या चित्रपटासाठी हिरवा कंदील दाखवला असून त्यानं आपल्याला या चित्रपटापटासाठी कामाचे तास फिक्स हवे आहेत असे सांगताना सेटवर शिस्त हवी. असेही म्हटले आहे.

Ranbir Kapoor Love And War Movie Sanjay Leela Bhansali
Ranbir Kapoor: 'अ‍ॅनिमल' नंतर रणबीरचा भाव वाढला! पुढील चित्रपटांसाठी घेणार 'इतके' कोटी?

यंदाच्या वर्षी नोव्हेंबर २०२४ पासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जून २०२५ पर्यत त्याचे चित्रिकरण सुरु राहणार आहे. यापूर्वी रणबीरला सेटवरील वेळेबाबत वेगवेगळ्या परिणामांना सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे त्यानं लव्ह अँड वॉरच्या बाबत काही वेगळ्या अटी ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.

पुढील वर्षी २०२५ मध्ये नाताळात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं आलिया आणि रणबीर हे पहिल्यांदाच भन्साळी यांच्या चित्रपटामधून झळकणार असल्यानं चाहत्यांना त्याविषयी कमालीची उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com