Priyanka Chopra Typical Indian Mother, Photo with her baby girl proved the statement  Instagram
मनोरंजन

अखेर प्रियंका चोप्राने सिद्ध केलंच की ती देखील टिपिकल भारतीय आई, का ते वाचाच

प्रियंका चोप्राने मुलीसोबतचे काही फोटो शेअर केले त्यावरनं आता तिच्यावर कौतुकाचा वर्षाव भारतातून होत आहे.

प्रणाली मोरे

Priyanka Chopra: प्रियंका चोप्रानं आपली मुलगी मालती चोप्रा जोनस सोबत काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मुलीसोबत प्रियंका स्विमिंग पूलच्या किनारी क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहे. मात्र मुलीच्या या फोटोसोबत प्रियंकानं हे सिद्ध करुन दाखवलं की ती टिपिकल भारतीय आई आहे. या फोटोंमधून तरी काहीसे असेच दिसत आहे.(Priyanka Chopra Typical Indian Mother, Photo with her baby girl proved the statement)

प्रियंका चोप्रानं मुलगी मालतीसोबत तिचे दोन फोटो शेअर केले आहेत,ज्यामध्ये एकात मालती आईच्या कुशीत विसावलेली असताना समोरच्या सुंदर नजाऱ्याचा आनंद घेताना दिसत आहे. प्रियंकाने मुलीचा आणखी एक फोटो शेअर केला आहे,ज्यामध्ये प्रियंकाच्या तोंडावर मुलीनं तिचे चिमुकले पाय आरामात टेकले आहेत. अर्थात या दोन्ही फोटोत एक गोष्ट नजरेस पडतेय जिच्यावर राहून राहून लक्ष जात आहे. प्रियंकाच्या मुलीच्या हातात बांधलेला काळा धागा आणि पायात काळ्या मण्यांची पैंजण. सोन्याच्या आणि काळ्या मण्यांनी बनवलेले पैंजण हार्ट शेपमध्ये आहेत,ज्यावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.

आता आपल्या देशात प्रत्येक आई आपल्या बाळाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी हातात आणि पायात काळा धागा बांधतेआणि कुणी त्याच धाग्यात काळे आणि सोन्याचे मणी गुंफुंनही तो बांधतात. तसं पाहिलं तर प्रियंकाने आतापर्यंत मुलीचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण यावेळी तिनं आपल्या मुलीला वाईट नजरांपासून वाचवण्यासाठी जे केलं त्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या अन् प्रत्येकाला प्रियंकाचे कौतूक वाटले.

अखेर प्रियंकाने हे सिद्ध केले की भले ती तिच्या व्यावसायिक आयुष्यात सुपरबिझी आहे पण प्रश्न जेव्हा कुटुंबाचा येतो तेव्हा तिथे तिचं काम ती दुय्यम स्थानी नेते. आणि कुटुंबाला प्रथम प्राधान्य देते. सध्या प्रियंका तिचं आईपण एन्जॉय करताना दिसत आहे. आणि हे खरंच आहे हे तिनं शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोतून कळत आहे.

प्रियंकाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. बोललं जात आहे की प्रियंका चोप्रा फरहान अख्तरचा आगामी सिनेमा 'जी ले जरा' मध्ये मुख्य भूमिकेत आहे,आणि तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफही दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET ते TET... 2024 मध्येच कायदा आला, तरी पेपरफुटी थांबली नाही; सरकारकडे उत्तर आहे का? नवीन कायदा कशासाठी? Fact Explained...

Gokul Politics : गोकुळ दूध संघात नवा ट्विस्ट! 'त्या' सहानुभूतीवरून शौमिका महाडिक यांच्यावर 410 सभासदांचा घणाघात; कोल्हापूरच्या राजकारणात नक्की काय घडतंय?

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Rojgar sangam Portal: कंपन्या थेट प्रोफाइल पाहून करणार शॉर्टलिस्ट; १० वी पास ते पदवीधरांना एका क्लिकवर मिळणार सरकारी नोकरी

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT