R Madhavan Bollywood Actress share x post income tax department  esakal
मनोरंजन

R Madhavan: 'आयकर विभागाचं कौतुक वाटतं कारण...'! माधवनची ती पोस्ट तुफान चर्चेत, मॅडी काय बोलून गेला?

आमच्या कंपनीनं देखील वेळेवर आयकर भरला. त्यानंतर तातडीनं त्याची दखल घेऊन त्याचे रिटर्नही आम्हाला मिळाले.

युगंधर ताजणे

R Madhavan Bollywood Actress share x post income tax department : साऊथचा प्रसिद्ध अभिनेता आर माधवन हा आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. एक्स वर त्याची व्हायरल झालेली पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यानं आयकर विभागाचे कौतुक करणारी पोस्ट नेटकऱ्यांच्याही प्रतिक्रियेचा विषय आहे.

आमच्या कंपनीनं देखील वेळेवर आयकर भरला. त्यानंतर तातडीनं त्याची दखल घेऊन त्याचे रिटर्नही आम्हाला मिळाले. संबंधित विभागाची काम करण्याची पद्धत आणि वेग याचे कौतुक आहे. त्यासाठी त्यांना धन्यवाद अशा शब्दांत माधवननं त्याच्या भावना व्यक्त केल्या असून त्याच्या त्या पोस्टची चर्चा आहे.

इतक्या लहान मुलांना फटाके वाजवायचे नसतात हे कसं समजवायचं?

आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या आणि सोशल मीडियावर सक्रिय राहून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये माधवनचे नाव घ्यावे लागेल. काही महिन्यांपूर्वी माधवनचा रॉकेट्री नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते.

आयकर विभागाचं कौतुक...

अभिनेतानं एक्सवर पोस्ट शेयर केली आहे. त्यात तो म्हणतो, आमच्या कंपनीनं जेव्हा आयकर भरला त्यानंतर तीन आठवड्यांच्या आत त्याचे रिटर्न आम्हाला मिळाले. मला या विभागाचे कौतुक आणि आश्चर्य वाटते. त्यांनी मोठ्या वेगानं हे सगळं काम केले. याबरोबरच माधवननं प्रधानमंत्री कार्यालय, वित्त मंत्री निर्मला सीतारमण, आयकर विभाग आणि वित्त मंत्रालय यांना देखील ती पोस्ट टॅग केली आहे.

नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव...

अभिनेत्याच्या त्या पोस्टवर त्या आता कमेंटसला उधाण आले आहे.नेटकऱ्यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, सर खूपच छान वाटलं. तुम्ही या गोष्टीची दखल घेतली याचं. पंधरा मिनिटांच्या आत तुमचे रिटर्न जमा झालेले असते. इतर काही जणांनी मात्र त्यावर असहमती दर्शवली आहे. आम्हाला अजून रिटर्न मिळालेले नाहीत. असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT