raavsaheb movie teaser starring mukta barve sonalee kulkarni mrunmayee deshpande  SAKAL
मनोरंजन

Raavsaheb Teaser: "देशाची सिस्टीम बिघडली की.." मुक्ता बर्वेच्या 'रावसाहेब'चा अंगावर काटा आणणारा टीझर

मुक्ता बर्वेच्या आगामी रावसाहेब सिनेमाचा टीझर भेटीला आलाय

Devendra Jadhav

Raavsaheb Teaser News: रावसाहेब सिनेमाचा टीझर भेटीला आलाय. अभिनेत्री मुक्ता बर्वे सिनेमात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतेय.

या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असुन. टीझर पाहून विषयाचा अंदाज येत नसला तरीही सिनेप्रेमींना काहीतरी जबरदस्त पाहायला मिळणार यात शंका नाही.

(raavsaheb movie teaser starring mukta barve sonalee kulkarni mrunmayee deshpande)

रावसाहेब सिनेमाच्या टीझरमध्ये काय?

रावसाहेब सिनेमाच्या टीझरमध्ये पाहायला मिळतंय की, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे आणि जितेंद्र जोशी हातात मशाल घेऊन घनदाट जंगलात दिसत आहेत.

मुक्ता, जितेंद्र, मृण्मयी पोलिसाच्या वेशात दिशेत आहेत. सर्वांसमोर काहीतरी आहे त्याच्याविरुद्ध हे सर्व आक्रमक पवित्रा घेऊन उभे आहेत. अशातच शेवटी जंगलात वाघाची पावलांचे ठसे उमटलेले दिसतात. एकूणच रावसाहेबचा टीझर पाहून अंगावर काटा उभा राहतो.

देशाची सिस्टीम बिघडली की सिस्टीमचं जंगल होतं… अशी सिनेमाची हटके टॅगलाईन आहे.

रावसाहेब कधी रिलीज होणार?

प्लॅनेट मराठीने रावसाहेब सिनेमाची निर्मिती केलीय. गोदावरी सिनेमाचा दिग्दर्शक निखिल महाजनने सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.रावसाहेब सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली नसली तरीही सिनेमा लवकरच सिनेमागृहांमध्ये पाहायला मिळणार आहे.

सिनेमात मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, जितेंद्र जोशी, प्रियदर्शन जाधव, रश्मी अगडेकर असे तगडे कलाकार झळकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT