Salman Khan Video: "भाईजान बरा आहेस ना?" सलमान खानचा नवीन डान्स व्हिडीओ पाहून चाहते अस्वस्थ

सलमान खानचा नवीन डान्स व्हिडीओ पाहताच चाहत्यांनी काळजी दर्शवली आहे
fans worried after watch salman khan dance video at delhi birthday party
fans worried after watch salman khan dance video at delhi birthday party SAKAL

Salman Khan Video News: बॉलिवूड सुपरस्टार सलामान खानचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. सलमान खानवर त्याचे फॅन्स अक्षरशः जीव ओवाळून टाकतात. सलमान खान सुद्धा त्याच्या फॅन्सच्या प्रेमाचा स्वीकार करताना दिसतो.

अशातच सलमान भाईजानची त्याच्या फॅन्सला काळजी लागून राहिली आहे. कारण सुद्धा तसंच आहे. सलमानचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून भाईजानच्या तब्येतीची त्याच्या फॅन्सना चिंता वाटतेय. जाणून घेऊ सविस्तर.

(fans worried after watch salman khan dance video at delhi)

fans worried after watch salman khan dance video at delhi birthday party
Gandhi Jayanti 2023 : 'दिसायला माणूस हडकुळा होता, छातीचा पिंजरा झाला होता, पण....'! किरण मानेंची गांधींवर खास पोस्ट

सलमान खानचा डान्स व्हिडीओ

सलमान खान नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात त्याच्या सदाबहार गाण्यांवर डान्स करताना दिसला. दिल्लीत एका बड्या उद्योगपतीच्या नातवाच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्यांने सहभाग नोंदवला. या बर्थडे पार्टीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झालेत. यात सलमान खान नाचताना दिसतोय.

एका व्हिडीओ क्लिपमध्ये सलमान त्याच्या दबंग चित्रपटातील सुप्रसिद्ध “हमका पीनी है” या गाण्यावर स्टेजवर नाचताना दिसत आहे. तथापि, चाहत्यांनी निरीक्षण केलं की, सलमान काहीसा "थकलेला" दिसतोय. अनेक लोकांनी भाईजानचे वाढलेलं वजन नोटीस केलंय.

भाईजानचं वाढलेलं वजन आणि तब्येत

एका यूजरने लिहिले की, “सलमानने त्याच्या तब्येतीची योग्य काळजी घेतली पाहिजे.” आणखी एक म्हणाला, "टायगर 3 नंतर थोडा ब्रेक घेऊन तब्येतीकडे लक्ष देऊन भाईजानने कमबॅक केला पाहिजे. असा अनफिट भाईजान चुकीचा वाटतो."

एकूणच सलमान खानच्या वाढलेल्या वजनावर आणि त्याच्या अनफिट असण्यावर अनेकांनी लक्ष दिलं असून भाईजानच्या तब्येतीबद्दल चिंता दर्शवली आहे.

सलमान खानच्या टायगर 3 ची उत्सुकता

अनेकांना सलमान खानच्या 'टायगर 3' सिनेमाची उत्सुकता आहे. टायगर 3 च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त, इमरान हाश्मी देखील खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

2012 मध्ये आलेल्या 'एक था टायगर' या फ्रेंचाइजीचा पहिल्या भाग आला त्यानंतर यानंतर सलमान आणि कतरिनाने 2017 मध्ये 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या सिक्वेलद्वारे पुनरागमन केले. हा भागही खुपच लोकप्रिय ठरला. त्यामुळे आता 'टायगर 3' ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. हा सिनेमा दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com