radhika apte shared childhood karate Taekwondo photos and said Do not mess with me sakal
मनोरंजन

Radhika Apte: चुकूनही माझ्या नादी लागू नका.. फोटो शेयर करत राधिका आपटेचा थेट इशारा..

राधिका आपटेच्या नव्या पोस्टची होतेय चर्चा..

नीलेश अडसूळ

Radhika Apte News: बॉलीवुडमध्ये जिच्या नावाचा दबदबा आहे आणि जिच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात अशी राधिका आपटे कायमच चर्चेत असते.

इंडस्ट्रीत तिच्या नवनवीन भूमिका, धाडसी प्रयोग आणि बोल्डनेस बाबत साऱ्यांनाच ठाऊक आहे, किंबहुना ती तिच्या बोल्ड अभिनयासाठी ओळखली जाते. बऱ्याचदा तिला अनेकांनी ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला गेला, पण राधिकाने तोडीस तोड उत्तर देत सर्वांची बोलती बंद केली.. आता तर तिने थेट माझ्या नादी लागू नका असा इशारा दिला आहे.

(radhika apte shared childhood karate Taekwondo photos and said Do not mess with me)

राधिकाने अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. राधिकाने आजवर 'बदलापूर', 'हंटर', 'पॅड मॅन', 'पारचड', 'लस्ट स्टोरीज', 'माझी' यासारखे अनेक दर्जेदार चित्रपट केले आहेत.

तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पडली आहेच पण तिच्या व्यक्तिमत्वानेही सर्वांना प्रभावित केले आहे. ती प्रचंड स्पष्टव्यक्ती आहे. तिच्यावर होणाऱ्या टीकेलाही तिने कायम सडेतोड उत्तरं दिली आहेत. पण याचं मूळ कुठेतरी तिच्या बालपणात आहे.

राधिकाने आज एक तिच्या लहानपणीचा फोटों शेयर केला आहे. या फोटोमध्ये राधिका प्रचंड गोड दिसत आहे. हा फोटो तिच्या कराटे क्लास मधला दिसतो आहे. सोबत इतर काही मित्र आणि तिचे शिक्षक असा हा कराटे ची पोज देतानाचा फोटो आहे.

हेही वाचा: दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

राधिकाने या फोटोला भन्नाट कॅप्शं दिले आहे. कराटे खेळत असल्याने तिने थेट सर्वाना इशारा दिला आहे. 'माझ्याशी पंगा घेऊ नका..' असं ती म्हणाली आहे.

तिचा हा फोटो सध्या बराच व्हायरल होत आहे. राधिका नुकतीच 'मोनिका ओ माय डार्लिंग' चित्रपटात झळकली होती. सध्या ती चित्रीकरणात व्यस्त असून लवकरच तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT