Rahul Gandhi Birthday  esakal
मनोरंजन

Rahul Gandhi Birthday : 'मुहब्बत की दुकान...!' उर्मिलाकडून राहुल गांधींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

यासगळ्यात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या आहेत.

युगंधर ताजणे

Rahul Gandhi Happy Birthday Urmila Matondkar Actress : कॉग्रेस पक्षाचे नेते आणि युवा वर्गामध्ये विशेष लोकप्रिय असणाऱ्या राहुल गांधींचा आज जन्मदिवस यानिमित्तानं मोठ्या प्रमाणावर देशभरातून शुभेच्छा मिळत आहे. सोशल मीडियावरुनही त्यांच्या लाखो कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

यासगळ्यात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या आहेत. कॉग्रेसमध्ये पदाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या आणि लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उर्मिलानं राहुल गांधींसाठी खास ट्विट केलं आहे. त्यावर अनेकांनी तिला प्रतिक्रियाही दिल्या आहे. आज देशभरातून राहुल गांधी यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत असल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे प्रकाशझोतात आले आहेत. कर्नाटकातील निवडणूकांमध्ये कॉग्रेसनं मारलेली बाजी ही त्यांच्यासाठी आत्मविश्वास वाढविणारी ठरली आहे. अशातच आगामी लोकसभा निवडणूकांसाठी राहुल गांधी मोठ्या निर्धारानं निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.याशिवाय येत्या काळात त्यांच्याशिवाय मोठी आव्हानंही असणार आहेत.

कॉग्रेसचे खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या राहुल गांधींचा जन्मदिवस सोशल मीडियावर देखील मोठ्या उत्साहानं साजरा केला जात आहे. त्यांच्याविषयी वेगवेगळ्या पोस्टही लिहिल्या जात असून त्यात त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

यासगळ्यात अभिनेत्री उर्मिलाची पोस्ट चर्चेत आली आहे. तिनं एक कविता राहुल गांधी यांच्यासाठी ट्विटरवर पोस्ट केली आहे.

तू न थकेगा कभी,

तू न रुकेगा कभी,

तू न मुड़ेगा कभी,

कर शपथ, कर शपथ, कर शपथ,

अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।

यह महान दृश्य है,

चल रहा मनुष्य है,

अश्रु श्वेत रक्त से,

लथपथ लथपथ लथपथ,

अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।

निडर नेता श्री.

@RahulGandhi तुम्हाला जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.. देव करो की तुम्ही, आजन्म मुहब्बत की दुकान चलाते रहें!!... अशा शब्दांत उर्मिलानं शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT