Congress esakal
मनोरंजन

जीना यहाँ मरना यहाँ.. गाण गाऊन 'या' काँग्रेस नेत्यानं दिले राजकीय संकेत

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेत्यानं गायलेलं एक गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय.

राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी गायलेलं एक गाणं सोशल मीडियावर (Social Media) चांगलंच व्हायरल झालंय. या गाण्याचे बोल आहेत, 'जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ' हे गाणं सचिन पायलट यांनी एका चॅरिटी कार्यक्रमात गायलं होतं. हे चित्रपटगीत असलं, तरी राजकारणाशी निगडीत असलेल्या व्यक्तीचं प्रत्येक पाऊल राजकारणाशी जोडताना दिसतंय. अशा स्थितीत पायलट यांनी हे गाणं गाऊन कोणते संकेत दिलेत, अशी अटकळ बांधली जातेय.

खरं तर सचिन पायलट यांना अलीकडेच संस्थेशी संबंधित मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. अशा स्थितीत पायलट यांना राजस्थानपासून दूर जावं लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. तर, दुसरीकडं राजस्थानमध्ये गेहलोत-पायलटमध्ये (Ashok Gehlot) सर्व काही सुरळीत चाललेलं दिसत नाहीय. मात्र, अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान सचिन पायलट यांनी सांगितलं, की मी पुढील 50 वर्षे कुठेही जाणार नाही. या सगळ्यात एका जाहीर कार्यक्रमात गायलेलं त्यांचं गाणंही याच्याशी जोडलं गेलंय.

Sachin Pilot

सचिन पायलट यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर या गाण्याची क्लिप शेअर करताच, ती व्हायरल झालीय. पायलट यांचे चाहते त्याच्या कौशल्याचं खूप कौतुक करताना दिसताहेत. पायलटांनी शेअर केलेली ही व्हिडिओ क्लिप आतापर्यंत जवळपास 60 हजार लोकांनी पाहिलीय. सचिन यांचं गाणं ऐकून तिथं उपस्थित लोकांनीही खूप एन्जॉय केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT