Rajasthan Cabinet: 15 जणांना मंत्रीपद; पायलट गटातील चार जणांची वर्णी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan Cabinet: 15 जणांना मंत्रीपद; पायलट गटातील चार जणांची वर्णी

Rajasthan Cabinet: 15 जणांना मंत्रीपद; पायलट गटातील चार जणांची वर्णी

जयपूर: राजस्थानमध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारच्या सर्व मंत्र्यांनी काल राजीनामे दिले होते. मुख्यमंत्री गेहलोत यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीनंतर हे राजीनामे घेण्यात आले होते. त्यानंतर राज्यात मोठं राजकीय घमासान सुरू झालं होतं. अचानक दिलेल्या या राजीनाम्यांनंतर सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसारच आता काही फेरबदल करुन नवीन लोकांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.

हेही वाचा: कृषी कायदे रद्दचा प्रस्ताव २४ नोव्हेंबरला कॅबिनेटमध्ये; मंजुरीची शक्यता

आज एकूण 15 मंत्र्यांनी जयपूरमधील राजभवनामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. कालराज मिश्रा हे राजस्थानचे राज्यपाल आहेत. त्यांच्या उपस्थितीत ही शपथ देण्यात आली आहे. या मंत्रीमंडळामध्ये 12 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर तीन राज्यमंत्री ज्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलंय की, काँग्रेस येत्या 2023 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच विजयी होईल.

हेही वाचा: सोबत राहण्यास नकार दिल्याने प्रियकरावर अ‌ॅसिड हल्ला, महिलेला अटक

16 महिन्यांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यांची समजूत काढण्यात आल्यानंतर ते थांबले, असं बोललं जातं. त्या उलथापालथीनंतर सुमारे 16 महिन्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल झाला आहे. या फेरबदलांमध्ये सचिन पायलट यांचे निष्ठावंत असलेल्या काही चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये रमेश मीणा, विश्वेंद्र सिंह, ब्रिजेंद्र सिंग ओला, हेमाराम चौधरी आणि मुरारीलाल मीणा यांना संधी देण्यात आली आहे.

कुणी कुणी घेतली मंत्रीपदाची शपथ?

ममता भूपेश, भजनलाल जाटव, टीकाराम जूली, राजेंद्र गुड्डा, झाहिदा खान, गोविंद राम मेघवाल, शकुंतला रावत, ब्रिजेंद्र सिंग ओला, मुरारी लाल मीना, महेंद्रजीत सिंग मालविया, रामलाल जट, महेश जोशी आणि विश्वेंद्र सिंग यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

loading image
go to top