Rajkumar Rao-Patralekha  Valentine Day
मनोरंजन

Valentine Day: राजकुमारनं पत्रलेखाला सांगितली 'दिल की बात'

सकाळ डिजिटल टीम

राजकुमार रावने (Rajkumar Rao) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपली दीर्घकाळची मैत्रीण पत्रलेखा (Patralekha) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. राजकुमार जवळजवळ दहा वर्षांपासून पत्रलेखाला डेट करत होता. लव्हबर्ड्स अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसाठी मजेदार पोस्ट शेअर करत असतात. व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) निमित्त राजकुमारने आपल्या प्रेयसीसाठी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा लग्नानंतरचा हा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे. खास प्रसंगी, अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या लग्नाच्या दिवसातील एक सुंदर फोटो शेअर केला. फोटोमध्ये, दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत आहेत. पत्रलेखा लाल साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती.

अलीकडेच, राजकुमारने मुलाखतीत पत्रलेखाशी लग्न केल्यानंतर त्याच्या आयुष्याविषयी खुलासा केला होता आणि आता मला पूर्ण वाटत असल्याचे सांगितले होते. “मला वाटते की आपल्याला आता सगळ्याची सवय झाली आहे. लग्नानंतर आम्ही दोघे व्यस्त होतो त्यामुळे बदल जाणून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. मी एवढेच म्हणेन की मला आता पूर्ण वाटत आहे. प्रेम नेहमीच होते आणि ते दररोज वाढत आहे. मला वाटते की हेच सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही नात्याला काहीही नाव देऊ शकता पण प्रेमाशिवाय काहीही चालत नाही, बरोबर?,” राजकुमार पुढे म्हणाला.

पत्रलेखाला त्याने पहिल्यांदा एका जाहिरातीत पाहिले होते. तेव्हापासून त्याला तिला भेटायचे होते. त्यानंतर दोघे पहिल्यांदाच 'सिटीलाईट' (Citylight) चित्रपटा दरम्यान भेटले होते. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला आणि अखेर ते लग्नबंधनात अडकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Live Update: मार्ग खुला झाल्यानंतर कतार भारताला एलएनजी पुरवठा सुरू करेल: सरकारी सूत्र

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT