Video:'तम्मा तम्मा' गाण्यावर माधुरीच्या पतिराजांनी केला एकदम कडक डान्स

दोघांनी केलेला डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Madhuri Dixit with Husband Dr.Shriram Nene
Madhuri Dixit with Husband Dr.Shriram NeneInstagram

बॉलीवूडची(Bollywood) धकधक गर्ल माधुरी दिक्षित(Madhuri Dixit) केवळ अभिनयातच नाही तर नृत्यातही तितकीच पारंगत आहे. तिच्या सिनेमात एक तरी गाणं तिचं असतं जे कायम हिट नंबर म्हणून ओळखलं गेलंय. आणि आपल्या बहारदार नृत्यशैलीसाठी तिनं नेहमीच दाद मिळवली आहे. ती अनेकदा छोट्या पडद्यावरही कितीतरी डान्स रिअॅलिटी शो चं परिक्षण करताना दिसली आहे. पण आता एक नवी गोष्ट समोर येतेय म्हणजे तिच्या घरातच कुणीतरी तिला डान्समध्ये मोठी टक्कर देण्यासाठी आलाय. आता घरातला हा प्रतिस्पर्धी नेमका आहे तरी कोण? तर ते दुसरं तिसरं कुणी नसून ते आहेत माधुरी दिक्षितचे पतीराज डॉ.श्रीराम नेने. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ते फिल्मी गाण्यावर ठेका धरीत दमदार डान्स केलेला आहे. फिल्मफेअरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केलेला आहे.

सोशल मीडियावर माधुरी आणि डॉ.श्रीराम नेने(Dr.Shriram Nene) यांचा एकत्र डान्स केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. असं म्हटलं जातयं डॉ.श्रीराम नेने यांच्या अलिकडेच झालेल्या बर्थ डे पार्टीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत माधुरी दिक्षितसोबत डॉ.नेनेंनी 'बद्रिनाथ की दुल्हनिया' या सिनेमातील 'तम्मा तम्मा अगेन' या गाण्यावर अगदी बेधुंद होत डान्स केलेला दिसून येत आहे. या दोघांना असं एकत्र पहिल्यांदाच डान्स करताना पाहिलं गेलं आहे. चाहत्यांना मात्र माधुरी आणि श्रीराम नेने यांचा डा डान्स व्हिडीओ खूपच आवडलेला दिसतोय. या व्हिडीओला प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका,निर्माती फराह खाननं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या पोस्टला शेअर करताना तिनं लिहिले आहे की,''राम वाढदिवसाच्या शुभेच्छा,माधुरी दिक्षितला तू खरंच चांगली टक्कर देत आहेस''. तिनं हॅशटॅगमध्ये कपलगोल असंही लिहिलं आहे.

माधुरी दिक्षितनेही आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर डॉ.श्रीराम नेने यांना वाढिदवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट शेअर करत माधुरीनं लिहिलं आहे,''माझा नवरा,माझा मित्र,माझा आत्मविश्र्वास,माझं हृद्य आणि जगातल्या सगळ्यात चांगल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा''. माधुरीचे पती डॉ.नेने हे एक डॉक्टर आहेत. ते याआधी अमेरिकेत राहत होते. १९९९ मध्ये माधुरी दिक्षितसोबत लग्न केल्यानंतर काही वर्षांनी ते अमेरिकेतून भारतात राहण्यासाठी आले होते. या दोघांना दोन मुलं आहेत. आता हे संपूर्ण कुटुंब भारतात सेटल झालं आहे. सध्या माधुरी नेटफ्लिक्सवरील 'द फेम गेम' या वेब सीरीजमधून आपल्यास दिसणार आहे. या सीरीजमध्ये माधुरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरीजमध्ये माधुरी दिक्षितसोबत संजय कपूर आणि मानव कौल देखील महत्त्वाच्या व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com