Raju Srivastava Heart attack condition Improved, latest Health update Google
मनोरंजन

Raju Srivastav यांच्या प्रकृतीत सुधारणा, कुटुंबिय म्हणाले,'दोन दिवसानंतर आज...'

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात १० ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.

प्रणाली मोरे

Raju Srivastav: दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यामुळे दाखल झालेले कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत दोन दिवसानंतर थोडी सुधारणा होत असल्याचं समोर आलं आहे. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रकृतीविषयी दिलेली अपडेट समोर येत आहे. त्यांच्या कुटुंबातील रजत श्रीवास्तव यांचे म्हणणे आहे की, राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा झालेली दिसून येत आहे. दोन दिवसांनंतर ट्यूबच्या सहाय्यानं त्यांना दूध दिल्याचं देखील कुटुंबिय म्हणाले. कानपूरमध्ये राजू श्रीवास्तव ज्या विभागात राहातात तिथे सगळे लोक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत अशी देखील माहिती रजत श्रीवास्तव यांनी दिली. राजू लवकरात लवकर बरा होऊन कानपूरला यावा अशी सगळ्यांची मनोकामना असल्याचं देखील ते म्हणाले.(Raju Srivastava Heart attack condition Improved, latest Health update)

बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील फोन करुन राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांच्याशी कॉमेडियनच्या तब्येतीविषयी विचारपूस केली. बीजेपी महामंत्री सुनिल बंसल यांनी देखील एम्स रुग्णालयात जाऊन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारणा केली. पण बोललं जात आहे की भले राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा दिसत असली तरी अद्यापही अवस्था चिंताजनक आहे.

गुरुवारी ११ ऑगस्ट रोजी बातमी होती की, राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत ना सुधारणा दिसली ना बिघाड. राजू श्रीवास्तव यांच्या मुलीनं वडीलांविषयी बोलताना म्हटलं होतं की, ''ते फिटनेस फ्रीक आहेत. पण हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या मेंदूवरही याचा परिणाम झाला आहे''

राजू श्रीवास्तव यांना बुधवारी १० ऑगस्ट रोजी जीममध्ये ट्रेडमिलवर असतानात झटका आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे. सध्या ते आयसीयूत तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत. त्यांचे चाहते देखील ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहेत.

राजू श्रीवास्तन आपल्या फिटनेसची खूप चांगली काळजी घ्यायचे. वर्कआऊट नित्यनेमाने करायचे. सोशल मीडियावरही ते खूप अॅक्टिव्ह असायचे. नेहमीच चाहत्यांना हसवायचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ पहायला मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT