Rakhi Sawant says 'thoda durr se bhai, mai shaadi shuda hoon’ as her fan tries to click selfie with her sakal
मनोरंजन

Rakhi Sawant: मै शादीशुदा हू.. म्हणत राखी सावंतचा नवा ड्रामा.. म्हणाली, माझ्यापासून जरा..

राखी सावंत आणि तिचं नवं लग्न? बघा काय आहे नेमकं प्रकरण..

सकाळ डिजिटल टीम

rakhi sawant and adil khan: ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती आदिल खानसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. राखीने सांगितले की, तीन महिने डेट केल्यानंतर तिने मागच्या वर्षी आदिलशी लग्न केले. मात्र आदिलने याला नकार देत आपले लग्न खोटे असल्याचे सांगितले. नंतर तिने पुन्हा एक विडिओ जाहीर करत आदिलने तिला स्वीकारल्याचे सांगितले, आता तर भर रस्त्यावर, मै शादीशुदा हू.. म्हणत फिरत आहे.

ड्रामा आणि राखी सावंत हे ठरलेले गणित आहे. सगळ्यांच माहिती आहे राखी सावंत ही तिच्या अंतरंगी ड्रामा मुळे आणि तिच्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत असते. बिग बॉस मराठी सिझन ४ मध्ये राखी सावंतचा ड्रामा चांगलाच गाजला. आता परत ती तिने तिचा नवीन प्रियकर आदिल खान दुर्रानी बरोबर लग्न केल्याचा नवीन ड्रामा सुरू केला आहे. राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये ती चक्क एक विवाहित स्त्री सारखी वागते आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

झालं अस की, राखी बरोबर फोटो काढण्यासाठी एक फॅन येतो आणि राखी बरोबर सेल्फी काढतो तर राखी चक्क बोलते " दुर राहुन फोटो काढ.. आता माझ लग्न झालं आहे, पहिल्याची गोष्ट वेगळी होती.. पण आता मी एक लग्न झालेली स्त्री आहे, त्यामुळे मला आता असं हात लाऊ शकत नाही."'

हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही यावर कमेंट केल्या आहेत. नेहमी इतरांना मिठी मारत, गळ्यात पडून गाठभेट करणारी राखी आता चक्क राखी सुधारली कशी? असं सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT