Ratna Pathak Shah: ..म्हणून संपूर्ण जगात भारतीयांची कुचेष्टा केली जातेय! रत्ना पाठक-शाह यांचा व्यवस्थेवर घाव.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratna Pathak Shah on boycott trend in bollywood and controversy

Ratna Pathak Shah: ..म्हणून संपूर्ण जगात भारतीयांची कुचेष्टा केली जातेय! रत्ना पाठक-शाह यांचा व्यवस्थेवर घाव..

Ratna Pathak Shah: मनोरंजन विश्वात असे अनेक स्टार्स आहेत जे आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. त्यातीलच एक नाव आणि मनोरंजन विश्वातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेत्री रत्ना पाठक शाह. त्या कायमच आपल्या अभिनयातून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करत आल्या आहेत. अनेकदा त्या मनोरंजनविश्वातील अनास्था आणि अनागोंदी विषयी भाष्य करताना दिसतात. नुकतेच त्यांनी बॉयकॉट प्रकरणावर भाष्य केले आहे.

(Ratna Pathak Shah on boycott trend in bollywood and controversy)

हेही वाचा: Kedar Shinde Birthday: केदार शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे म्हणजे.. वाचा त्यांच्या मैत्रीचा भन्नाट किस्सा

नुकतेच रत्ना पाठक शाह यांनी 'भारतीय आज जगभरात कुचेष्टेचा विषय बनले आहेत, असं एका मुलाखतीत म्हटलं आहे. बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या वाढत्या ट्रेंडवर म्हणजेच boycott trend वर त्या बोलत होत्या.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, जेव्हा एखाद्या चित्रपटावर बहिष्कार टाकला जातो, त्यावर चुकीच्या पद्धतीने भाष्य केलं जातं हे पाहून मला खूप त्रास होतो. आपण सुंदर कला आणि परंपरेला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि वाईट गोष्टी मागे सोडल्या पाहिजेत."

पुढे त्या म्हणाल्या, "आपल्याला चांगले चित्रपट बनवता यायला हवेत, आणि पाहायला ही हवेत. आपल्याकडे चित्रपटात काय म्हणायचं आहे त्यापेक्षा चित्रपट कुणी केलाय? त्यात काय परिधान केलंय? कोण काय काय म्हणालंय? कुणाचा अपमान झालाय? याकडेच जास्त लक्ष दिले जाते. असं असेल तर कला अशा वातावरणात कशी टिकेल?" असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Bollywood News