Ranbir And Karan Johar Viral Video  esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor : 'मला ऐकू येतयं मी बहिरा नाहीये...' रणबीर करण जोहरवर का संतापला?

रणबीर कपूर आणि करण जोहरच्या (Ranbir Kapoor Karan Johar Viral video) त्या व्हिडिओनं सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor Karan Johar : संदीप रेड्डी वांगाच्या प्रसिद्ध अशा त्या अॅनिमल नावाच्या चित्रपटामुळे रणबीरची सगळीकडे मोठी लोकप्रियता दिसून येते आहे.त्या चित्रपटापटातील भूमिकेसाठी फिल्मफेयरच्या (sandeep Reddy Vanga) पुरस्कारानं देखील गौरविण्यात आले होते. गेल्या वर्षीची सर्वाधिक चर्चेतील फिल्म म्हणून अनेकांनी अॅनिमलवर शिक्कामोर्तब केले (Animal movie) होते.

आता सध्या रणबीर कपूर हा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्यानं (Filmfare 2024) करण कपूरसमोरचं अॅनिमलमधली डायलॉग बोलून दाखवला आणि उपस्थित सेलिब्रेटींना मोठा धक्का बसला. असं काय झालं (Ranbir Kapoor Latest News) की, ज्यामुळे रणबीरला एवढा राग अनावर झाला असा प्रश्न यावेळी नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये फिल्मफेयर पुरस्कार सोहळा पार पडला.

यावेळच्या फिल्मफेयरचं होस्टिंग हे प्रसिद्ध अभिनेता आयुषमाननं केलं. त्याचवेळी रणबीर हा करण जोहरवर ओरडताना दिसला. तो व्हिडिओ (Ranbir And Karan Johar news) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्या व्हिडिओमध्ये दिसते की, रांगेत बसलेला करण जोहर हा रणबीरशी काही बोलतो आहे. त्याचवेळी त्यानं करण जोहरला आपल्या अॅनिमल चित्रपटातील डायलॉग म्हणून दाखवला आहे.

त्या व्हिडिओमध्ये करण जोहर हा रणबीरकडे मदत मागताना दिसतो आहे. तो म्हणतो, मला माहिती आहे रणबीर मी म्हणतो तसे करेल, त्या ते करावेच लागेल. काही करुन रणबीरला आमची मदत करावी लागेल. त्यानंतर रणबीरनं ओरडून करणला सांगितले की, मला ऐकू येतयं मी काही बहिरा नाहीये.

रणबीरच्या त्या कृतीनं आयुषमान त्याच्याकडे बघतच राहतो. त्याला काही कळतच नाही. नंतर त्याला कळते की हा त्यांच्या नाटकाचा भाग होता. रणबीरच्या बाबत बोलायचे झाल्यास त्याला यंदाच्या फिल्मफेयरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारानं गौरविण्यात आले. त्यानं अॅनिलमध्ये जे काम केले त्याच्यावरुन तो चर्चेत आला होता.

फिल्मफेयरचा पुरस्कार स्विकारताना रणबीर भावूक झाला होता. तो म्हणाला की, हा पुरस्कार मी माझ्या वडिलांना ऋषी कपूर यांना अर्पण करतो. मी प्रत्येक दिवशी तुमच्याबाबत विचार करतो. तुमच्या आठवणीत राहतो. रणबीरच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो संजय लीला भन्साळी यांच्या लव अँड वॉरमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT