Ranvir Shorey Apologized  esakal
मनोरंजन

Ranvir Shorey : 'प्रभु श्रीराम, मला माफ करा! अभिनेता रणवीरला मागावी मागली माफी'?

आपल्या वैशिष्टयपूर्ण अभिनयानं चाहत्यांचे आणि जागतिक पातळीवरील फिल्ममेकर्सचे लक्ष वेधून घेणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये रणवीर शौरीचे नाव घेतले जाते.

युगंधर ताजणे

Ranvir Shorey Apologized : आपल्या वैशिष्टयपूर्ण अभिनयानं चाहत्यांचे आणि जागतिक पातळीवरील फिल्ममेकर्सचे लक्ष वेधून घेणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये रणवीर शौरीचे नाव घेतले जाते. तो जसा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तसेच परखड वक्तव्यामुळेही त्याला अनेकदा ट्रोल व्हावे लागले आहे.

देशभरामध्ये सध्या राममंदिरच्या उद्धघाटनाचा माहौल आहे. त्यावरुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येमध्ये धामधुमीचे वातावरण असून जय्यत तयारीही करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी खास कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. अशावेळी सोशल मीडियातून येणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत.

अशातच अभिनेता रणवीर शौरीच्या प्रतिक्रियेनं उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. असं काय झालं की, रणवीरला प्रभु श्रीराम यांची माफी मागावी लागली आहे. तर रणवीरनं काही दिवसांपूर्वी अयोध्या आणि अयोध्येतील प्रभु श्रीराम यांचे मंदिर यावर पोस्ट शेयर केली होती. त्यात त्यानं जे म्हटले होते त्यावरुन नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता.

रणवीरनं लिहिले होते की, मी पहिल्यांदा देखील हिंदूमध्ये सहभागी होतो. जी लोकं ही राम मंदिर आणि बाबरी मस्जिद केसच्या दरम्यान त्या विवादित जागेवर मोठं रुग्णालय बांधण्याचा विचार करत होते. त्यांच्या त्या पक्षामध्ये मी देखील सहभागी होतो. त्यामुळे मी आता त्या सर्वांची माफी मागतो. माझ्या त्या जुन्या मागणीमुळे मला माफी मागावी लागत आहे. हे प्रभु श्रीराम मला माफ कर आणि मला सदबुद्धी दे...

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात प्रभु श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी पूर्ण शहराची सजावट करण्यात आली आहे. देशभरातील विविध मान्यवरांना त्यासाठी निमंत्रणही देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच या खास सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील विमानतळाचे आणि नव्या रेल्वेचे उद्धघाटन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT