Ayodhya News : घरोघरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करा; पंतप्रधान मोदींचे अयोध्येतून आवाहन

‘रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा ऐतिहासिक क्षण असून आपल्या सर्वांचे भाग्य थोर असल्यामुळेच हा क्षण आपल्या आयुष्यात आला आहे.
Narendra Modi
Narendra Modisakal

अयोध्या - ‘रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा ऐतिहासिक क्षण असून आपल्या सर्वांचे भाग्य थोर असल्यामुळेच हा क्षण आपल्या आयुष्यात आला आहे. देशभरातील १४० कोटी नागरिकांनी २२ जानेवारी रोजी आपापल्या घरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथून देशवासीयांना केले. ‘आताच सर्वांनी दर्शनासाठी अयोध्येला येण्याची घाई करू नये,’ असेही त्यांनी सांगितले.

‘एकीकडे अयोध्येतील भव्य राम मंदिराचे स्वप्न साकार होत असताना १४ ते २२ जानेवारी या काळात सर्व तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी,’ असेही त्यांनी नमूद केले. आज अयोध्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘महर्षी वाल्मीकी विमानतळ’, नव्या रेल्वे स्थानकाचे उद्‍घाटन करण्यात आले तसेच हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांचेही लोकार्पण करण्यात आले.

पंतप्रधानांच्या रोड शोमुळे अयोध्यानगरी भगव्या रंगात न्हाऊन निघाली होती. विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या उद्‍घाटनानंतर आयोजित रॅलीमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आपण सर्वांनी या क्षणासाठी ५५० वर्षांपेक्षा अधिक काळ वाट पाहिली, आता आणखी थोडा वेळ वाट पाहा. येथे २२ जानेवारी रोजी होत असलेल्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला अयोध्येत यावे, असे वाटणे स्वाभाविक आहे पण ते शक्य नाही.

त्यामुळेच माझी सर्व रामभक्तांना विनंती आहे की, २२ जानेवारीचा येथील सोहळा पार पडल्यानंतर आपल्या सोयीनुसार त्यांनी येथे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी यावे.’ दरम्यान अयोध्येतील मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आठ हजारजणांना निमंत्रण देण्यात आले असून या मंदिराच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या पंधरा टक्के लोकांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे समजते.

सेल्फी अन् चहा

पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची लाभार्थी ठरलेल्या मीरा मांझी या दलित महिलेच्या घराला भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी चहाही घेतला. थेट पंतप्रधानच घरी आल्याने मांझी कुटुंब भारावून गेले होते. पंतप्रधानांनी आजच्या या दौऱ्यामध्ये काही मुलांची भेट घेत त्यांच्यासोबत सेल्फीही काढले. मोदींची स्वाक्षरी घेण्यासाठी बच्चेकंपनीने गर्दी केली होती.

छत्तीसगडमधून तीनशे मेट्रिक टन तांदूळ

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आज छत्तीसगडमधून तीनशे मेट्रिक टन एवढे सुगंधित तांदूळ पाठविण्यात आले. तब्बल अकरा ट्रकमधून हे तांदूळ अयोध्येला रवाना झाले असून मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या ट्रकला हिरवा झेंडा दाखविला. अयोध्येतील मुख्य सोहळ्यातील प्रसादासाठी या तांदळाचा वापर करण्यात येईल.

तयारीत व्यत्यय नको

‘सध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून त्यामध्ये अडथळा येता कामा नये. भाविकांनी विनाकारण येथे गर्दी करू नये, मंदिर कोठेही जाणार नाही. अनेक शतके ते येथेच राहील. या सोहळ्यासाठी निवडक लोकांनाच निमंत्रित करण्यात आले आहे, त्यामुळे ज्यांना निमंत्रण आहे त्यांनीच अयोध्येत यावे.

भाविकांना २३ तारखेनंतर प्रवास करणे अधिक सोयीचे होईल. आता लाखो लोकांच्या स्वागतासाठी अयोध्येने सज्ज राहायला हवे. अनंतकाळासाठी येथे भाविक येत राहतील. हे शहर जगातील सर्वांत स्वच्छ शहर बनावे म्हणून स्थानिकांनी शपथ घ्यायला हवी,’ असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com