Raqesh Bapat Answers Trolls Questioning Him On Shamita Shetty Google
मनोरंजन

'कोणी कोणाला फसवलं?', शमितासोबत ब्रेकअपच्या प्रश्नांवर राकेश बापटचं उत्तर

राकेश बापटनं एक पोस्ट शेअर करत शमिता शेट्टीसोबतच्या ब्रेकअपवरुन ट्रोल करणाऱ्यांवर पलटवार केला आहे.

प्रणाली मोरे

बिग बॉस ओटीटी आणि बिग बॉस सिझन १५ नंतर राकेश बापट(Raquesh Bapat)-शमिता शेट्टी(Shamita Shetty) यांचे नाते भलतेच चर्चेत आले होते. कितीतरी वेळा दोघांमध्ये दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अनेकदा ते वेगळे झाल्याचे दावे केले गेले. त्यानंतर कळलं की दोघं एकमेकांपासून अखेर वेगळे झाले आहेत. पण ही कन्फर्म बातमी समोर आल्यानंतर राकेश बापटला खूप विचित्र प्रश्नांचा सामना करावा लागला. ब्रेकअप(Breakup) संदर्भात ट्रोलर्सनी विचारलेल्या त्या सगळ्या प्रश्नांना आता राकेशनं तिखट शब्दात उत्तरं दिली आहेत.(Raqesh Bapat Answers Trolls Questioning Him On Shamita Shetty)

राकेश बापटनं एक पोस्ट शेअर केली आहे,ज्यामध्ये त्याने शमिता शेट्टीसोबतच्या ब्रेकअप बाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. त्यानं एक प्रकारे ट्रोलर्सवर पलटवार केला आहे. राकेश बापटने आपल्या पोस्टला एक लांबलचक कॅप्शन दिलं आहे. ज्यामध्ये त्याने त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

राकेश बापटने आपला एक शर्टलेट फोटो शेअर करत लिहिलं आहे,''कोण कोणाला डेट करतो? कोणी कोणाला फसवलं? कोणी काय घातलंय? कोणाचं कुटुंब चांगलं आहे,कोणाचं वाईट? कोण कोणाचं समर्थन करतोय? त्याविरोधात जर आपण ''माझं जन्माला येण्याचं कारण काय आणि मी काय देणं लागतो या देशाचं,जगाचं? माझं आयुष्यातलं व्हिजन काय आहे? माझं ध्येय काय आहे? आपण प्रश्न विचारण्याची पद्धत बदलू शकतो का? मी नंतर जे बोललो ते थोडं कठीण आहे. पण बदलून बघा''.

राकेश बापटने ट्रोलर्सला म्हटलं आहे की,''कृपया मी जे नंतर म्हणालोय तसं वागण्याचा प्रयत्न नक्की करा,जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर. जर आपण तसं वागाल तर तुम्हालाही त्याच प्रकारे प्रेम परत मिळेल''. राकेशच्या यो पोस्टवर नेहा भसीनने प्रतिक्रिया नोंदवत ट्रोलर्सला नकळत सुनावलं आहे. तिनं लिहिलं आहे,''जे तोंडात येईल ते प्रत्येक वेळेला बोलायचं,एवढंच येतं''. नेहाच्या या प्रतिक्रियेवरनंही तिनं ट्रोलर्सवरच निशाणा साधल्याचं कळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थ्यांचा निर्लज्जपणे राजकारणासाठी वापर, धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका

Delhi Police DCP Sandeep Lamba : पोलिसांनी मुलींवर कानाखाली मारणे कायद्यात बसतं का?, डीसीपी संदीप लांबांनी तरूणीला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांनी घेरलं

Live Updates Marathi : दिल्लीतील जंतरमंतरवर भर पावसात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Pune Rain: धरणसाखळीला पावसाचा जबरदस्त बूस्ट! अवघ्या २४ तासांत १,३८० एमसीएफटी पाण्याची आवक, साठा ७३% वर

Priyanka Gandhi: ‘आंदोलन दडपण्याचा सरकारला अधिकार नाही’; सुटकेनंतर प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT